भाजप, काँग्रेसमधील नाराज कार्यकर्ते धजदमध्ये

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

बेळगाव - बेळगुंदी मतदारसंघातील भाजप आणि काँग्रेसमधील नाराज कार्यकर्त्यांनी धजदमध्ये जाहीर प्रवेश केला. परिणामी काँग्रेस आणि भाजपची बेळगुंदी जिल्हा पंचायत मतदारसंघातील ताकद कमी झाली आहे. तर जनता दलाने या भागात जोरदार कार्यकर्त्यांची फळी उभारण्यास सुरु केली आहे. 

बिजगर्णीत पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम नुकताच झाला. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील धजद अध्यक्ष अशोक पाटील अध्यक्षस्थानी होते. ते म्हणाले, गेल्या कित्येक वर्षापासून हे कार्यकर्ते भाजप आणि काँग्रेसमध्ये कार्यरत होते. पण, दोन्ही पक्षातील गावपातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे. योग्य पर्याय नसल्यामुळे कार्यकर्ते खितपत पडले होते. 

आता बेळगाव तालुक्‍यात धजदने चांगला उमेदवार दिल्यामुळे त्या उमेदवाराच्या मागे राहण्यासाठी या कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. त्यानंतर जवळपास ८० हून अधिक कार्यकर्त्यांनी धजदमध्ये प्रवेश घेतला. तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील, एम. के. पाऊसकर, परशराम कोलकार, के. जी. पाटील व परशराम कदम यांनी त्यांना पक्षाचा झेंडा देऊन पक्षात सामावून घेतले. एम. के. पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election