गडकरींच्या प्रचाराचा शिवसेनेकडून निषेध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

बेळगाव -  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बेळगुंदीत (ता. बेळगाव) महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवाराविरोधात भाजप उमेदवाराचा प्रचार केल्याचा नागपूर शिवसेना जिल्हाप्रमुखांनी निषेध केला आहे. भाजपला महाराष्ट्रात याची किंमत मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

‘बेळगावात अशोक चव्हाण, नितीन गडकरी समितीविरोधात प्रचारात’ या मथळ्याची बातमी ई-सकाळला प्रसिद्ध होताच महाराष्ट्रभरातून विविध प्रतिक्रिया उमटल्या. सीमाभागातही या बातमीची चर्चा होती. महाराष्ट्रातील राजकीय पटलावर वादळी चर्चा झाली. संध्याकाळी नागपूर शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून नितीन गडकरी यांच्या प्रचाराचा निषेध केला.

भाजप सीमाभागात मराठी मतांचे ध्रुवीकरण करत आहे. सीमाप्रश्‍नामुळे शिवसेनेने सीमाभागात निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी गडकरी सीमाभागात समितीविरोधी प्रचार करत आहेत. महाराष्ट्रात मराठीविरोधी भूमिका घेणारे भाजप नेते सीमाभागात मराठी मतांचे ध्रुवीकरण करत आहेत. याचा आम्ही निषेध करत असून याची किंमत त्यांना महाराष्ट्रात मोजावी लागेल’, असे वक्‍तव्य त्यांनी केले आहे.

सीमावासीयांची नाराजी
काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सीमाभागात म. ए. समिती उमेदवारांना पाठींबा दिला आहे. असे असतानाही बेळगावातील राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नितीन गडकरी, अशोक चव्हाण आदी प्रभावी मराठी नेते येत असल्यामुळे नाराजी व्यक्‍त होत आहे.

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election