सिद्धरामय्यांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही - येडियुरप्पा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

बंगळूर - राज्यात गेल्या पाच वर्षांत भ्रष्टाचार करून लूट केलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचारावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. विधानसभा निवडणुकीत लोक त्यांना चांगलीच अद्दल घडवतील, असा विश्वास माजी मुख्यमंत्री व धजदचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी व्यक्त केला.

बंगळूर - राज्यात गेल्या पाच वर्षांत भ्रष्टाचार करून लूट केलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचारावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. विधानसभा निवडणुकीत लोक त्यांना चांगलीच अद्दल घडवतील, असा विश्वास माजी मुख्यमंत्री व धजदचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी व्यक्त केला. बंगळूर प्रेस क्‍लबतर्फे आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

ते म्हणाले, सिद्धरामय्या यांनी काय केले? किती भ्रष्टाचार केला? सारे काही माहित आहे. माझ्यावर वेळोवेळी आरोप करणे योग्य नाही. माझ्याविरुध्द एकही भ्रष्टाचार सिध्द झालेला नाही. 
न्यायालयात सर्व काही स्पष्ट झाले आहे. असे असूनही सिद्धरामय्या लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. निवडणुकीत लोक त्यांना चांगलाच पाठ शिकवतील. कोणत्याही परिस्थितीत राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होणार नाही. स्पष्ट बहुमतासह भाजप सत्तेवर येईल असा विश्‍वास व्यक्‍त करतानाच सिद्धरामय्यांना आणखी एका आठवड्यात लोक घरी बसवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election