बहुमतासह पुन्हा सत्तेत येऊ - सिद्धरामय्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

बंगळूर - राज्यात भाजप आणि धजदने कितीही प्रयत्न केला, तरी ते सत्तेवर येणार नाहीत. त्रिशंकू स्थितीही राज्यात निर्माण होणार नाही. त्यामुळे स्पष्ट बहुमतासह काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला. प्रेस क्‍लबतर्फे आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. 

बंगळूर - राज्यात भाजप आणि धजदने कितीही प्रयत्न केला, तरी ते सत्तेवर येणार नाहीत. त्रिशंकू स्थितीही राज्यात निर्माण होणार नाही. त्यामुळे स्पष्ट बहुमतासह काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला. प्रेस क्‍लबतर्फे आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. 

ते म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची कोणतीही जादू राज्यात चालणार नाही. धजदचेही सत्तेचे स्वप्न साकार होणार नाही. पंतप्रधान मोदी खोटी आश्वासने देऊन लोकांना फसविण्याचे काम करत आहेत. गेल्या चार वर्षाच्या कालावधीत केंद्र सरकारला म्हादई प्रश्न सोडविता आला नाही. तसेच शेतकऱ्यांचे कर्जही माफ केलेले नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदींवर आता लोकांचा आता विश्वास राहिलेला नाही.’’

सिद्धरामय्या उवाच...

  •  मोदींकडे सांगण्यासारखे काही नाही  कर्नाटक सरकारवर खोटे आरोप
  •   माझ्यावरील आरोपांचे पुरावे असतील तर दाखवा
  •   मोदींनीही दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली

केंद्रातील भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. आपण कोणती विकासकामे केली, हे पंतप्रधानांकडे सांगण्यासारखे नसल्यामुळे ते कर्नाटक सरकारवर खोटे आरोप करत आहेत. मात्र, काँग्रेस सरकार राज्यात केलेली विकासकामे पुढे करून लोकांकडे मतयाचना करत आहे. सध्या भाजपचे नेते खालच्या पातळीवरील भाषा वापरुन प्रचार करत असून ही भाषा त्यांना शोभत नसल्याचेही सिद्धरामय्या म्हणाले. 

१० टक्के कमीशन सरकार, सिधा रुपय्या सरकार अशा प्रकारचा आरोप करणाऱ्या पंतप्रधान मोदींनी त्यांच्या जवळ काही पुरावे असल्यास ते जनतेसमोर ठेवावेत. दोन मतदारसंघात निवडणूक लढवित नसल्याचे सांगणाऱ्या नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीत दोन मतदारसंघात का निवडणूक लढविली, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

गेल्या पाच वर्षात राज्यातील दलितांच्या कल्याणासाठी काँग्रेस सरकारने अनेक कार्यक्रम राबवले. मतांचे राजकारण करण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर दलितांविषयी खोटी सहानुभूती दाखविल्यास लोक विश्वास ठेवणार नाहीत, असाही टोला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी लगावला.

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election