चामुंडेश्‍वरीत अस्वस्थता, बदामीत आशा

संजय उपाध्ये
मंगळवार, 8 मे 2018

‘चामुंडेश्‍वरी’चा कोप झाला तरी मुख्यमंित्रपदी विराजमान होण्यास कोणताही अपशकुन होऊ नये, तसेच मुख्यमंत्री उत्तर कर्नाटकाचे प्रतिनिधी करणार आहेत, असे सांगत अतिशय ‘टॅक्‍टीकल’ दुहेरी खेळी खेळत काँग्रेसच्या नेत्यांनी सिद्धरामय्या यांना बदामीतूनही रिंगणात उतरविले आहे.

चामुंडेश्‍वरीत धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या जी. टी. देवेगौडा यांनी तगडे आव्हान निर्माण केले आहे. तर खासदार बी. श्रीरामलू यांनी बदामीत सिद्धरामय्या यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या प्रतिस्पर्धींवर मात करत सिद्धरामय्या कसे विजयापर्यंत जातात ते पाहायचे आहे.

बदामी मतदारसंघ
सिद्धरामय्या यांना आपल्या चाळीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये चामुंडेश्‍वरीतच पराभवाचा धक्का बसला आहे. तर एकदा केवळ २५७ मतांनी विजयी झाल्यामुळे राजकीय पुनर्जन्म झाला असल्याची भावना त्यांनीच बोलून दाखविली होती. त्यामुळेच त्यांना पक्षश्रेष्ठींनी बदामीतून लढण्याची संधी दिली आहे.
बदामीत ४५ हजार कुरुबा मतदार आहे. त्यानंतर ५० हजार लिंगायत, ५० हजार अनुसूचित जाती-जमाती आणि वीस हजार मुस्लीम असे मतगट्टे आहेत. त्यामुळेच सिद्धरामय्या यांना विजयाची संधी अधिक आहे. त्यांच्या प्रचाराची मोहीम यमकनमर्डीचे उमेदवार सतीश जारकिहोळी यांनी सांभाळली आहे.

चामुंडेश्‍वरी मतदारसंघ
म्हैसूरचे उपनगर असले तरी एका बाजूला शहरी तर काही भाग ग्रामीण अशी चामुंडेश्‍वरीची रचना आहे. शेती कमी होत जाऊन रियल इस्टेट, ले-आऊट, टाऊनशिप किंवा इंडस्ट्रीयल इस्टेट निर्माण होत आहेत. चामुंडेश्‍वरी मतदारसंघात तब्बल २,५०० लहान, मध्यम आणि मोठे उद्योग आहेत. हे सर्व सहा विविध औद्योगिक विभागात  एकवटले आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या कारखान्यातून तब्बल दीड लाख कामगार काम करतात, पण ते मतदार नाहीत, ही सिद्धरामय्या यांची सर्वात मोठी शोकांतिका आहे. तसेच एप्रिल आठला मतदार याद्या नूतनीकरणात तब्बल ७,७०० मतदारांची नोंद झाली आहे. धजदमधून बाहेर पडल्यानंतर चामुंडेश्‍वरीमधूनच सिद्धरामय्या यांना पोटनिवडणूक लढविली होती. त्यावेळी जी. टी. देवेगौडा यांनी त्यांना जोरदार लढत दिली होती. आणि केवळ २५७ मतांनी निवडूण आले होते. सिद्धरामय्या यांचा ‘राजकीय पुनर्जन्म’ असे वर्णन या लढतीचे केले होते.

 

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election