सिद्धरामय्या सरकारची उलटी गणती सुरु - योगी आदित्यनाथ

मिलिंद देसाई
मंगळवार, 8 मे 2018

बेळगाव - कर्नाटकातही कॉंग्रेसचा पराभव होणार असून सिद्धरामय्या सरकारची उलटी गणती सुरु झाली आहे, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ हे येथे आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकांरांशी संवाद साधला. सोमवारी रात्री ते बेळगावात आले होते. त्यांनी गणेशपुर येथील हुक्केरी हिरेमठ या मठात वास्तव्य केले. योगी आदित्यनाथ परिसरात आल्याची माहिती कोणालाही नव्हती. मात्र मठाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते.  त्यानंतर नागरिकांनी याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

विद्यालयांच्या नावाखाली देशद्रोही कृत्य सहन केले जाणार नाही. मनी शंकर अय्यर यांची विकृत मानसिकता असून वीर सावरकर यांची तुलना जिना यांच्या बरोबर करणे म्हणजे देशद्रोही कृत्य असून सावरकर हे महान क्रांतिकारी व देशभक्त होते.  2019 मध्येही देशातील जनता मोदी सरकारच्या बरोबर राहील. राहुल गांधीना जे लिहून दिले जाते तेच राहुल बोलतात मोदी सरकारने लागू केलेल्या योजनांमुळे देशातील नागरिकांचा जीवन स्तर सुधारला आहे 

- योगी आदित्यनाथ

बेळगाव उत्तर मतदार संघातील भाजपचे आमदार संजय पाटील यांच्या प्रचारासाठी मन्नूर येथे आयोजित सभेनंतर रात्री 9 वाजता योगी मठामध्ये दाखल झाले. त्यांनी मठामधील महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याला पुष्यहार अर्पण केला. मंगळवारी सकाळी योगा व ध्यान धारणा केली. सकाळी 7.30 च्या सुमारास त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

देशात सर्वाधिक आत्महत्या या कर्नाटकात होत आहेत शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना का राबविल्या जात नाहीत गरिबांना घरे मिळाली नाहीत, स्वच्छ भारत योजना का राबविली जात नाही असा प्रश्‍नही त्यांनीही उपस्थित केला.

राहुल गांधीकडे कोणताही अजेंडा नसून पेट्रोल व डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये वाढले तर देशात वाढतात, मोदी सरकारने अनेकांना गरिबांना घरगुती गॅस उपलब्ध करून दिले, भारताची अर्थ व्यवस्था मोदी सरकारमुळे मजबूत झाली आहे, भाजपचा कार्यकर्ता म्हणून कर्नाटकात प्रचारासाठी आलो असून उत्तर प्रदेशात कानून व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भाजपच्या तीन कार्यकर्त्यांची हत्या सिद्धरामय्या सरकारमध्ये झाली. त्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे, असेही योगी म्हणाले. 

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election