लोकेच्छेसाठी समितीच्या उमेदवारांना निवडा - आमदार आबिटकर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

खानापूर - संयुक्त महाराष्ट्राचा लढा आता तिसऱ्या पिढीच्या हातात आहे. महाराष्ट्रात जाण्याचा सीमावासियांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. ही जिद्द महाराष्ट्राला कर्तव्याची आठवण करून देत आहे. सीमाप्रश्‍न सर्वोच्य न्यायालयात असून न्यायदेवता मराठी माणसाला नक्कीच न्याय देणार. पण, त्याठिकाणी लोकेच्छेसाठी आमदार अरविंद पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करा, असे प्रतिपादन राधानगरीतील शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. 

खानापूर तालुका म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार अरविंद पाटील यांच्या प्रचारार्थ मगंळवारी (ता. 8) जांबोटी येथे जाहीर सभा झाली. त्यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी रामभाऊ किनारी होते. मध्यवर्ती समिती अध्यक्ष दीपक दळवी, आमदार अरविंद पाटील, कोल्हापूर मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंत मुळीक, उदयसिंह सरदेसाई, ऍड. राजाभाऊ पाटील, शकंर देसाई, खानापूर समिती अध्यक्ष देवाप्पा गुरव, सचिव गोपाळ देसाई, जगन्नाथ बिर्जे आदी व्यासपीठावर होते. 

आमदार आबिटकर म्हणाले, ""सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात लोटला असला तरी येथील वातावरण पाहता आजही मराठी शाश्‍वत असल्याची खात्री मिळते.''

उदयसिंह सरदेसाई म्हणाले, ""सीमाप्रश्‍नाच्या नावाखाली काही जणानी वेगळी चूल मांडून फूट पाडण्याची कुटिलनीती अवलंबली आहे. अशा माणसापासून मराठी माणसांनी दोन हात दुरुच राहीले पाहिजे.''

प्रा. डॉ. एन. डी. पाटील व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सीमाप्रश्‍नासाठी फार मोठे योगदान दिले असून देत आहेत. त्यांची जागा दुसरा कोणीही घेउ शकत नाही. आमदार अरविंद पाटील यांनी मतयाचना केली. सुरवातीला रामापूर पेठ ते जांबोटी राजवाड्यापर्यंत पदयात्रा काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. 
 
न्यायालयीन लढ्यासाठी पाकीस्तानला गुडघे टेकावयास लावणाऱ्या हरिष साळवे सारख्या तज्ज्ञ वकीलांची फौज आमच्याकडे आहे. सीमाबांधवाना न्याय मिळणार हे नक्कीच आहे. त्यामुळे लोकेच्छेसाठी मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे याच्याबरोबर खानापूरचे आमदार अरविंद पाटील यांना विजयी करावे. 
- दीपक दळवी,
अध्यक्ष, मध्यवर्ती समिती 

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election