आमिषांना न भाळता लोकेच्छा दाखवा - जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

सांबरा - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मराठी मतदारामध्ये फाटाफूट करण्यासाठी राष्ट्रीय पक्षाकडून बुध्दीभेद करण्याचा प्रयत्न होत आहे. विविध प्रकारची आमिषे दाखवून मतदारांना वळवण्याचा प्रयत्न होत आहे. पण याला थारा न देता म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार मनोहर किणेकर यांनाच मतदान करून प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. 

सांबरा येथे बुधवारी (ता. 8) समितीचे अधिकृत उमेदवार मनोहर किणेकर यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबीटकर म्हणाले, ""मराठी मातीशी एकरुप होण्यासाठी बेळगावसह सीमाभागातील जनता महाराष्ट्रात येण्यास आतुरलेली आहे. याला शिवसेनेने नेहमीच पाठिंबा दिला आहे. मनोहर किणेकरसारखे गुणवाण नेते विधासभेच्या रिंगणात असून त्याच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पाठबळ देणे आवश्‍यक आहे. त्यांना जनाधार लाभत असून त्यांचे हात बळकट करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्‍यक आहे.'' 

मागच्या निवडणुकीत चूक झाली. पण यावेळी होणार नाही. समितीशिवाय मराठी माणसाला पर्याय नाही. गड जिंकून सिंह गमावण्याची घटना इतिहासात घडली होती. आता 12 तारखेला विरोधकांचे पानिपत करून समितीला विजयी करा.

- प्रा. मधुकर पाटील  

सुभाष ओऊळकर, ता. पं. सदस्य सुनिल अष्टेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, मराठा क्रांती मोर्चाचे कोल्हापूरचे समन्वयक वसंत मुळीक, मधुरा कुंडेकर यांनी विचार मांडले अध्यक्षस्थानी इराप्पा जोई होते.

सीमाभागातील मराठी भाषिकांना नेहमीच शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठिंबा दिला आहे. यासाठी सीमाभागात हे दोन्ही पक्ष निवडणूक न लढवता समितीला पाठबळ देतात. मात्र महाराष्ट्रातील काही राष्ट्रीय पक्षाचे नेते समिती विरोधात प्रचार करून आपली लायकी दाखवतात. त्यांना अशा प्रकारचा कोणताच नैतिक अधिकार नसून त्यांना महाराष्ट्रात जाब विचारणार. 
- प्रकाश आबिटकर,
शिवसेना आमदार 

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election