बेळगाव जिल्ह्यात 891 मतदान केंद्रे संवेदनशील 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

बेळगाव - बेळगाव जिल्ह्यात 891 मतदान केंद्रे संवेदनशील असल्याचे मुख्य मतदान अधिकारी संजीवकुमार यांनी जाहीर केले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 58 हजार 8 मतदान केंद्रांची स्थापना केली आहे. त्यातील 12 हजार 1 मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. सर्वाधिक 1 हजार 595 संवेदनशील मतदान केंद्रे बंगळूरमध्ये आहेत.

बेळगाव - बेळगाव जिल्ह्यात 891 मतदान केंद्रे संवेदनशील असल्याचे मुख्य मतदान अधिकारी संजीवकुमार यांनी जाहीर केले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 58 हजार 8 मतदान केंद्रांची स्थापना केली आहे. त्यातील 12 हजार 1 मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. सर्वाधिक 1 हजार 595 संवेदनशील मतदान केंद्रे बंगळूरमध्ये आहेत. त्यापाठोपाठ बेळगावचा क्रमांक आहे.म्हैसूर जिल्हा 632 मतदान केंद्रांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

बेळगाव जिल्हा राज्यात सर्वात मोठा आहे. जिल्ह्यात अठरा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे, मतदान केंद्रांची संख्याही जास्त आहे. या संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात येणार असल्याचे संजीव कुमार यांनी सांगितले. त्या ठिकाणी केंद्रीय जलद कृती दलातील जवान तैनात केले जातील किंवा तेथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ठेवली जाईल. आवश्‍यकता भासल्यास त्या ठिकाणी सूक्ष्म निरीक्षकांची संख्या वाढविली जाईल. निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर केंद्रीय पथकाचे 45 हजार जवान राज्यात दाखल झाले आहेत. 

निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे, त्यांच्याकडून पोस्टल मतदान करवून घेतले जाणार आहे. राज्यात अशा 28 हजार 662 मतदारांची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक म्हणजे 14 हजार 302 मतदार बेळगाव जिल्ह्यातील आहेत. त्यापाठोपाठ हासन व विजापूर जिल्ह्यातील मतदारांची संख्या आहे. यावेळी पोस्टल मतदानासाठी इलेक्‍ट्रॉनिकली ट्रान्स्मिटेड पोस्टल बॅलेट सिस्टमचा वापर केला जाणार आहे. त्याबाबतची जागृती केली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election