काँग्रेसची ‘विदाई’ निश्‍चित - नरेंद्र मोदी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

राज्यातील काँग्रेसचे सरकार निद्रिस्त असून, या शासनाची ‘विदाई’ (पाठवणी) निश्‍चित आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केले.

बेळगाव - स्मार्ट सिटीसाठी निवड झालेल्या राज्यातील शहरांसाठी केंद्राने ८३६ कोटींचा निधी दिला. परंतु काँग्रेस सरकारने अवघा १२ कोटींचा निधी खर्च केला. यावरून या सरकारला विकासाची किती तळमळ आहे हे दिसून येते. राज्यातील काँग्रेसचे सरकार निद्रिस्त असून, या शासनाची ‘विदाई’ (पाठवणी) निश्‍चित आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केले.

जिल्हा क्रीडांगणावर सभा झाली. सुमारे ४० मिनिटांच्या भाषणात ते म्हणाले, काँग्रेस हळूहळू देशाच्या नकाशावरूनच नव्हे, तर जनतेच्या हृदयातूनही हद्दपार होत आहे. राज्यात काँग्रेसने पाच वर्षांत काय विकास केला, याचा हिशेब द्यायला हवा. बेळगावात मतदारांना कुकर वाटले जात असून, हे पवित्र लोकशाहीचे लक्षण नव्हे, असा टोलाही हाणला.

मोदी म्हणाले...

  •     बेळगाव शहराला उडान योजनेशी जोडणार
  •     भाजपचा उद्देश इंडिया फर्स्ट, काँग्रेसचा उद्देश परिवार फर्स्ट 
  •     १५ रोजी ईव्हीएम गडबडची कोल्हेकुई सुरू होणार

 

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election