फिरोज सेठ यांच्यावर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

बेळगाव - न्यू गांधीनगरमधील पदयात्रेवेळी पाकच्या घोषणा दिल्याच्या तक्रारीवरून आमदार फिरोज सेठ यांच्यासह समर्थकांवर बुधवारी (ता. ९) माळमारुती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. जातीय तेढ निर्माण करत देशाच्या अखंडतेला धक्‍का पोचविण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला आहे.

आमदार फिरोज सेठ यांची ६ मे रोजी न्यू गांधीनगरला सभा होती. सभा उरकून फिरोज सेठ आणि त्यांचे समर्थक निघून जात असताना काही समर्थकांनी पाकिस्तानच्या घोषणा दिल्या. याबाबतचा व्हिडिओ गेले दोन दिवस सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे, शहर परिसरात संतापाची भावना आहे. याप्रकरणी भाजपने आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे. तसेच भाजप कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर निदर्शने करुन निवेदनही दिले. 

ॲड. प्रवीण करोशी यांनी याबाबत माळमारुती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आमदार सेठ यांच्या सभेनंतर दुपारी चारच्या सुमारास झालेल्या पदयात्रेत सेठ यांच्या मागून येणाऱ्या समर्थकांनी घोषणा दिल्या. यामुळे समाजात जातीय तेढ निर्माण होऊन देशाच्या अखंडतेला धक्‍का पोचविण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी फिर्यादीत केली आहे. त्यानुसार आमदार सेठ यांच्यासह समर्थकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 
 
काँग्रेस उमेदवार फिरोज सेठ यांच्या न्यू गांधीनगरमधील प्रचारावेळी पाकिस्तान समर्थनाच्या घोषणा दिल्याचे आढळून आहे. या विरोधात माळमारुती पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आमदार सेठ आणि त्यांच्या समर्थकांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
- ॲड. प्रवीण करोशी, तक्रारदार

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election