वाढीव मतदान कोणाच्या पारड्यात ? 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

बेळगाव - गतवेळेप्रमाणे यंदाही बेळगाव ग्रामीण मतदारसंघात चुरशीने मतदान झाले. यंदा सुमारे चार टक्‍के मतदान वाढलेले आहे. हे वाढीव मतदान कुणाच्या पारड्यात जाणार, याबाबत लोकांत उत्सुकता लागून आहे. 

बेळगाव - गतवेळेप्रमाणे यंदाही बेळगाव ग्रामीण मतदारसंघात चुरशीने मतदान झाले. यंदा सुमारे चार टक्‍के मतदान वाढलेले आहे. हे वाढीव मतदान कुणाच्या पारड्यात जाणार, याबाबत लोकांत उत्सुकता लागून आहे. 

गतवेळच्या तुलनेत या निवडणुकीत पैशांचा वापर मोठा झाला. प्रत्येक मतदाराला टार्गेट करून पैशांचा पाऊस पाडण्यात आला. काहींनी तर गेल्या सहा महिन्यांपासूनच साहित्यांच्या स्वरूपात आमिषांची पेरणी केली होती. येनकेन प्रकारे आमदारकीची स्वप्ने पाहणाऱ्यांना पैशाचा वापर केला.

दुसरीकडे भाषा, अस्मिता या विषयावर निवडणूक लढविण्यात आली. त्यामुळे चुरशीने मतदान झाले. बेळगावच्या पश्‍चिम भागात सरासरी 80 टक्‍के मतदान झाले आहे. हे वाढलेले मतदान नेमके पैशाचे आहे की स्वाभीमानाचे, असा प्रश्‍न उभा ठाकलेला आहे. 

काही भागात साटेलोट्याचे राजकारण सुरू होते. ऐनवेळी दुपटीने पैसा वाढवून देण्यात आला. त्यामुळे, मतदान कुणाकडे झुकले याबाबतही उत्सुकता लागून आहे. गेल्यावेळी सुमारे 74 टक्‍के मतदान झाले होते. त्यावेळी म. ए. समिती आणि भाजपला मतदान वाढले होते. 

चार टक्के मतदान 
यंदा चार टक्‍के मतदान वाढले आहे. पैशांचा खेळ वाढला असल्यामुळे ही मते कोणाकडे झुकणार, अशी उत्सुकता लागून आहे. ही वाढीव चार टक्‍के मतदान विजयात महत्त्वाची भूमिका वठवणार आहेत.

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election