चिक्कोडी-सदलगा मतदार संघात काँग्रेस विजयी पण मताधिक्‍य घटले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

चिक्कोडी - बहुचर्चित ठरलेल्या व पारंपारिक राजकीय लढ्यात अखेर खासदार प्रकाश हुक्केरी यांनी चिक्कोडी-सदलगा मतदार संघात आपलेच वर्चस्व असल्याचे सिध्द करुन दाखविले आहे.

चिक्कोडी - बहुचर्चित ठरलेल्या व पारंपारिक राजकीय लढ्यात अखेर खासदार प्रकाश हुक्केरी यांनी चिक्कोडी-सदलगा मतदार संघात आपलेच वर्चस्व असल्याचे सिध्द करुन दाखविले आहे. भाजपच्या प्रचंड ओघात केवळ कार्यकर्त्यांच्या बळावर एकाकी लढत देत कॉंग्रेसचे खासदार प्रकाश हुक्केरी यांनी सलग दुसऱ्यांदा गणेश हुक्केरी यांना आमदारकी मिळवुन दिली. पण सतत गेल्या दोन निवडणुकीत घटत चालले मतधिक्‍य हा आता कॉंग्रेससाठी आत्मचिंतनाचा विषय आहे. 

भाजपने कोणतीही पूर्वतयारी नसताना ऐनवेळी हुक्केरी यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी अण्णासाहेब जोल्ले यांना उमेदवारी दिली. या मतदार संघात पूर्वीपासुन कार्यरत असलेल्या भाजप व आरएसएसच्या फळीने जोल्ले यांना पाठबळ दिला. जोल्ले यांनी असलेल्या मनुष्यबळाचा पुरेपूर वापर करुन अल्पवधीत चांगली हवा निर्माण केली होती. 2008 पासुन निर्माण झालेल्या या मतदार संघात भाजपने कॉंग्रेसच्या सत्तेला उलथवुन टाकण्यासाठी तोडीस तोड असलेल्या अण्णासाहेब जोल्ले यांना मुद्दामहुन उमेदवारी दिली. त्यांच्या दिमतीला राज्यसभा सदस्य डॉ. प्रभाकर कोरे, विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ तसेच माजी आमदारांचा ताफा होता. 

उलट कॉंग्रेस उमेदवार गणेश हुक्केरी यांच्या बाजुने सर्व खिंड खासदार प्रकाश हुक्केरीच एकाकीपणे लढवित होते. पुत्र गणेश हुक्केरी यांना राजकारणात स्थिर करण्यात त्यांना यश मिळाले असले तरी इतक्‍या मोठ्या प्रमाणात विकासकामे करुनही मताधिक्‍य घटले ही बाब त्यांना आत्मचिंतन करण्यास लावणारी आहे. तर गतवेळी कॉंग्रेसचे असलेले 32 हजाराचे मताधिक्‍य आता 10 हजारावर आले आहे. अण्णासाहेब जोल्ले यांना या मतदार संघात पुन्हा सक्रीय होण्यास बळ मिळाले आहे. 

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election