मुख्यमंत्री कुमारस्वामी की येडियुराप्पा? 

संजय सूर्यवंशी
मंगळवार, 15 मे 2018

बेळगाव - सर्वाधिक 104 जागा जिंकून भाजप मोठा पक्ष झाला असला, तरी दुसऱ्या क्रमांकाच्या कॉंग्रेसने आततायीपणा करीत तिसऱ्या क्रमांकाच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. या त्रिशंकु स्थितीत मुख्यमंत्री कोण होणार? हा प्रश्‍न सध्या अनुत्तरित आहे.

बेळगाव - सर्वाधिक 104 जागा जिंकून भाजप मोठा पक्ष झाला असला, तरी दुसऱ्या क्रमांकाच्या कॉंग्रेसने आततायीपणा करीत तिसऱ्या क्रमांकाच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. या त्रिशंकु स्थितीत मुख्यमंत्री कोण होणार? हा प्रश्‍न सध्या अनुत्तरित आहे.

धजदने कॉंग्रेसला पाठिंबा दिल्यास मुख्यमंत्रीपद कुमारस्वामींना मागणार हे निश्‍चित आहे, तर भाजपने कमी पडणाऱ्या आठ जागांसाठी फोडाफोडीचे राजकारण करत ऑपरेशन कमळ राबविल्यास येडियुराप्पा मुख्यमंत्री होतील, अशी चिन्हे आहेत. 

राज्यात त्रिशंकु स्थिती उद्‌भवणार, असाच मतदानपूर्व चाचण्यांचा अहवाल दर्शवित होता. तशीच स्थिती सध्या उद्‌भवली आहे. भाजपला 104, कॉंग्रेसला 78 तर धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या वाट्याला बहुजन समाज पक्षाची एक जागा धरून 38 जागा आल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही पक्षाला बहुमत गाठता न आल्यामुळे मुख्यमंत्री कोण? हा प्रश्‍न सध्या तरी अनुत्तरित आहे. 

कॉंग्रेसची घाई, धजदला पाठिंबा 
आपल्या पक्षाची सत्ता येत नाही, हे लक्षात येताच मुख्यमंमत्री सिद्धरामय्या व प्रदेशाध्यक्ष डॉ. जी. परमेश्‍वर यांनी माध्यम प्रतिनिधींना सामोरे जात तातडीने धजदला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. परंतु, मुख्यमंत्री कोण? यावर मात्र त्यांनी चुप्पी धरली. माजी पंतप्रधान देवेगौडा आणि सिद्धरामय्या यांचे फारसे सख्य नाही. शिवाय ते आपला मुलगा कुमारस्वामी यांच्यासाठी मुख्यमंत्रीपदाची मागणी करू शकतात. इकडे भाजपला सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी अद्याप 8 जागा कमी पडतात. त्यामुळे कमी पडणाऱ्या जागा फोडणार की पूर्वीचे ऑपरेशन कमळ राबवून पुन्हा सत्तेत येण्याचा भाजप प्रयत्न करणार, हे पहावे लागेल. 

आठवण 2008 च्या पक्षीय बलाबलची 
2008 मध्येही काहीशी अशीच स्थिती होती. त्यावेळी भाजपने 110, कॉंग्रेसने 80, धजदने 28 तर अपक्षांनी 6 जागा जिंकल्या होत्या. परंतु, अपक्षांना सोबत घेऊन तेव्हा येडियुराप्पांनी सरकार स्थापन केले. नंतर ऑपरेशन कमळ राबवून कॉंग्रेस व धजते आणखी काही आमदार फोडल्याचे स्पष्ट झाले होते. तसाच प्रकार आताही होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election