अथणी मतदारसंघात भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार 

के. परशराम 
मंगळवार, 15 मे 2018

अथणी मतदारसंघ 

अथणी - अथणी विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार महेश कुमठहळ्ळी, भाजपचे उमेदवार लक्ष्मण सवदी आणि धजदचे गिरीश भुटाळे यांच्यात तिरंगी लढत झाली. याशिवाय 11 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. लक्ष्मण सवदी हे चौथ्यांदा, तर महेश कुमठहळ्ळी हे दुसऱ्यांदा निवडणुकीस उभे होते. मतदारसंघात जातनिहाय मतदान झाल्याने त्यामध्ये भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात कॉंटे की टक्कर होऊन कॉंग्रेसचे उमेदवार महेश कुमठहळ्ळी हे विजयी झाले. 

माजी मंत्री असलेल्या आमदार लक्ष्मण सवदी यांचा विजयाचा चौकार हुकला. महेश कुमठहळ्ळी यांच्या विजयामुळे मतदारसंघात भाजपच्या बालेकिल्ल्याला मोठे खिंडार पाडण्यात कॉंग्रेसला यश मिळाले आहे. आता भाजपला पुन्हा येथे जम बसविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मुसंडी मारावी लागणार आहे. लक्ष्मण सवदी यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती; पण मतदारांनी जबरदस्त धक्का दिल्याने भाजपला हार पत्करावी लागली आहे. 

सन 2003 पूर्वी हा मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. तो उद्‌ध्वस्त करून लक्ष्मण सवदी यांनी 2003 मध्ये तो भाजपच्या ताब्यात घेतला. सलग तीनवेळा ते या मतदारसंघात निवडून आले. आता चौथ्यांदा निवडणूक लढवित होते, मात्र कॉंग्रेसच्या महेश कुमठहळ्ळी यांनी बाजी मारत त्यांचा पराभव केला.

मतदारसंघात जातीचे राजकारण झाल्याने लिंगायत समाजाची मते महेश कुमठहळ्ळी यांच्या पारड्यात पडली, तर धनगर समाजानेही पूर्णपणे कॉंग्रेसला पाठिंबा दिला. भाजपचे उमेदवार लक्ष्मण सवदी यांच्या कार्यकर्त्यांनीच त्यांना पराभूत केल्याची चर्चा आहे. तेलसंग जिल्हा पंचायत मतदारसंघ सतत भाजपच्या पाठीशी असून, या वेळी जातीनिहाय राजकारण झाल्याने भाजपला विरोध करून कॉंग्रेसच्या पाठीशी गेले. त्यामुळे भाजपवर पराभवाचा धक्का सहन करण्याची वेळ आली. 

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election