कळसा भांडुरा योजनेसाठी महाराष्ट्र-गोवा सीएमशी बोलू- येडीयुरप्पा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

कळसा भांडुरा योजनेचा लढा गेल्या अनेक दिवसापासून सुरु आहे. केंद्रात पंतप्रधान मनमोहन यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार असताना जल लवादाकडे विषय दाखल झाला. आता काँगेस लवादाकडे बोट दाखवून हातवर करत आहे.

बेळगाव : कळसा भांडुरा योजनेसाठी महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांच्या सीएमची संमती घेण्याची तयारी आहे. विरोधी पक्षांचे मन वळविण्याचे काम काँग्रेस पक्षाने करावे, असे कर्नाटक भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बी.एस. येडीयूराप्पा यांनी कन्नड साहित्य भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

कळसा भांडुरा योजनेचा लढा गेल्या अनेक दिवसापासून सुरु आहे. केंद्रात पंतप्रधान मनमोहन यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार असताना जल लवादाकडे विषय दाखल झाला. आता काँगेस लवादाकडे बोट दाखवून हातवर करत आहे. पण, लवादाच्या बाहेर हा विषय सोडविणे शक्य आहे. त्यासाठी गोवा आणि महाराष्ट्र मुख्यमंत्रयाची संमती मी घेतो. विरोधी पक्ष म्हणून  दोन्हीकडे काँग्रेस आहे. त्यांचे मन वळविण्याचे काम काँगेस पक्षाने करावे, असे आवाहन येडीयूराप्पा यांनी केले आहे.

पीककर्ज माफीसाठी 10 जुलै रोजी बंगळुराला मोर्चा आयोजित केला आहे. चार ते पाच लाख लोक मोर्चात सहभागी होतील. 13 जिल्ह्याचा दौरा केला आहे. दौऱ्यात राज्यातील शेतकऱ्याच्या पिकाची आणि दुष्काळ परिस्थिती पहिली आहे. शेतकरी संकटात आहे. त्यामुळे कर्ज माफी देण्याची मागणी करणार आहे, अशी माहिती येडीयूराप्पा यांनी दिली.

Web Title: belgaum news karnataka yediyurappa talk fadnavis, goa, kalsa bhandura scheme