बेळगावात भाऊजीचा मेहुण्यावर चाकू हल्ला

संजय सूर्यवंशी 
बुधवार, 4 एप्रिल 2018

बेळगाव - भाऊजीने मेहुण्यावर चाकू हल्ला केल्याची घटना आज सकाळी नऊच्या सुमारास सह्याद्री नगर येथे घडली. पत्नीला माहेरी पाठवून देत नसल्याच्या रागातून भाऊजीने हा हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

बेळगाव - भाऊजीने मेहुण्यावर चाकू हल्ला केल्याची घटना आज सकाळी नऊच्या सुमारास सह्याद्री नगर येथे घडली. पत्नीला माहेरी पाठवून देत नसल्याच्या रागातून भाऊजीने हा हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

संदीप रामाप्पा नाईक ( 29 ,राहणार सह्याद्रीनगर बेळगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. घटनेनंतर हल्लेखोर तरुण दुर्गाप्पा निंगाप्पा शिवाप्पागोळ (30, राहणार धरनट्टी, ता. बेळगाव) हा फरारी झाला. याबाबत एपीएमसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की संदीपची बहीण चंद्रव्वा हिचा विवाह दुर्गाप्पाशी झाला आहे. परंतु दुर्गाप्पा हा पत्नी चंद्रव्वाला सतत मारहाण करीत होता. त्याच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून काही दिवसांपूर्वी चांद्रव्वा माहेरी निघून आली होती.

आज सकाळी नऊच्या सुमारास दुर्गाप्पा सह्याद्रीनगर येथे सासरी गेला .त्याने पत्नीला आपल्यासोबत पाठवून देण्याची मागणी केली. परंतु संदीप व त्याच्या घरच्यांनी पाठवून देण्यास नकार दिला. हे तुमचे नेहमीचे भांडण मिटविण्यासाठी आधी पंचमंडळींना सोबत घेऊन ये मग बहिणीला पाठवून देतो, असे संदीपने दुर्गाप्पाला सुनावले. यातूनच भांडण वाढत जाऊन हाणामारी झाली.

यावेळी दुर्गाप्पाने सोबत आणलेल्या चाकूने मेहुण्याच्या छातीवर व पोटावर सपासप वार केले. यामध्ये संदीप गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले परंतु, घाव गंभीर असल्याने त्याला केएलई मध्ये हलविण्यात आले. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे एपीएमसीचे पोलिस निरीक्षक रमेश हनापूर यांनी सांगितले. फरारी दुर्गाप्पाचा शोध सुरू असून त्याला लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Belgaum News knife attack incidence