चिक्कोडी जिल्हा मागणीसाठी वकिलांचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

चिक्कोडी - चिक्कोडी जिल्हा मागणी आंदोलन आता दिवसाकाठी चिघळत असून 46 व्या दिवशी आज (ता.22) आंदोलकांनी पुन्हा बसवेश्‍वर सर्कलमध्ये टायरी पेटवून रास्ता रोको केला. त्यामुळे सुमारे तासभर वाहतूक खोळंबली होती. तसेच शंभरावर वकिलांनी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घालून आंदोलनात सहभाग घेतला.​

चिक्कोडी - चिक्कोडी जिल्हा मागणी आंदोलन आता दिवसाकाठी चिघळत असून 46 व्या दिवशी आज (ता.22) आंदोलकांनी पुन्हा बसवेश्‍वर सर्कलमध्ये टायरी पेटवून रास्ता रोको केला. त्यामुळे सुमारे तासभर वाहतूक खोळंबली होती. तसेच शंभरावर वकिलांनी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घालून आंदोलनात सहभाग घेतला.

वकील संघटनेच्या वतीने 1978 पासून चिक्कोडी जिल्हा मागणीचा प्रस्ताव पाठविण्यात येत आहे. जिल्हा मागणी आंदोलनाला येथील वकिल संघटनेचा नेहमीच पाठींबा लाभला आहे. यापूर्वीही वकील संघटनेच्यावतीने आंदोलनाला पाठींबा मिळाला आहे. आज शंभरावर वकिलांनी कामकाजवर बहिष्कार घालून आंदोलनात सहभाग घेतला. 

जिल्हा मागणी आंदोलकांनी आज पुन्हा शहरातील नेहमी गजबजलेल्या बसवेश्‍वर सर्कलमध्ये टायरी पेटवून निपाणी-मुधोळ व संकेश्‍वर-जेवरगी या राज्य महामार्गावरील वाहतूक अडविली. जिल्हा घोषणेस विलंब करणाऱ्या राज्य शासन व मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आठवडी बाजार असल्याने व आंदोलकांनी आज रास्ता रोको केल्याने त्याचा फटका अनेक नागरिकांना बसला. वाहतूक सुरळीत करण्यासाठी रहदारी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली.

आंदोलनात बी. आर. संगाप्पगोळ, राष्ट्रीय माजी सैनिक समन्वय समितीचे राज्याध्यक्ष बाळासाहेब सांग्रोळे, माजी आमदार दत्तू हक्‍क्‍यागोळ, चंद्रकांत हुक्केरी, सुरेश ब्याकुडे, संजू बडिगेर, बी. आर. यादव, एम. बी. पाटील, मानिकाम्मा कबाडगी यांच्यासह आंदोलक व वकील सहभागी झाले होते. 

Web Title: Belgaum News Lawyer agitation for Chikodi District Demand