बेळगावातील तिहेरी खून खटल्यातील आरोपीला जन्मठेप

महेश काशीद
सोमवार, 16 एप्रिल 2018

बेळगाव - अनैतिक संबंधातून कुवेपुनगरला झालेल्या तिहेरी खून खटल्यातील आरोपीला आज जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. द्वितीय अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने आज (ता. 16) ही शिक्षा सुनावली. प्रवीण सुब्रमण्यम भट्ट (वय 26, रा. चिक्कूबाग, कुवेपुनगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

कुवेपुनगर येथील विवाहिता रीना राकेश मालगत्ती ( वय 37) व भट्ट याचे अनैतिक संबंध होते. या संबंधातून विवाहिता रिना आणि आदित्य (वय 11), साहित्या (3) या दोन मुलांची 16 ऑगस्ट 2015 रोजी भट्ट याने हत्या केली. या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात झाली. त्यात भट्ट याला दोषी ठरविले. आज त्याला जन्मठेपेची शिक्षा आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठाविला आहे.

Web Title: Belgaum News life imprisonment to accused in the triple murder case