मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज बेळगावतर्फे शिनोळी येथे रास्ता रोको

मिलिंद देसाई
रविवार, 29 जुलै 2018

बेळगाव - मराठा समाजाला आरक्षण देण्याबरोबरच सीमाप्रश्नाची सोडवणूक करावी, या मागणीसाठी सकल मराठा समाज बेळगावतर्फे आज (रविवारी) शिनोळी येथे रास्ता रोको करण्यात आला. 

बेळगाव - मराठा समाजाला आरक्षण देण्याबरोबरच सीमाप्रश्नाची सोडवणूक करावी, या मागणीसाठी सकल मराठा समाज बेळगावतर्फे आज (रविवारी) शिनोळी येथे रास्ता रोको करण्यात आला. 

यामध्ये बेळगावसह  चंदगड तालुक्यातील हजारो मराठा बांधव सहभागी झाले आहेत. एक मराठा लाख मराठा, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे आदी घोषणा देत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रविवार असल्यामुळे अांबोली व इतर ठिकाणी जाणाऱ्या वाहनाच्या रांगा दोन्ही बाजूला लागल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.  धर्मवीर संभाजी चौकातील संभाजी राजेच्या पुतळ्याला अभिवादन करुण कार्यकर्ते शिनोळी येथे दाखल झाले. रास्ता रोको आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिनोळी बंद ठेवण्यात आली होती. माजी आमदार मनोहर किणेकर, सकल मराठा समाजाचे प्रकाश मरगाळे, गुणवंत पाटील, कोल्हापुर शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे, बेळगाव शिवसेनेचे प्रकाश शिरोळकर यांच्यासह हजोरो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. 

Web Title: Belgaum News Maratha reservation agitation in Shinoli