बेळगावचे महापौरपद अनुसूचीत जमातीसाठी आरक्षीत

मल्लिकार्जुन मुगळी
बुधवार, 3 जानेवारी 2018

बेळगाव: बेळगावचे महापौरपद अनुसूचीत जमातीसाठी आरक्षीत ठेवण्यात आल्याने मराठी भाषिकांना महापालिकेतील सत्ता गमवावी लागणार आहे. बेळगाव महापालिकेत सत्ताधारी गटाकडे अनुसूचीत जमातीचा एकही नगरसेवक नाही, विरोधी गटाकडे मात्र असे दोन नगरसेवक आहेत. त्यामुळे सत्ताधारी गटाला यावेळी पालिकेची सत्ता गमवावी लागणार हे नक्की झाले आहे.

उपमहापौरपद इतर मागास अ महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. हे पद सत्ताधारी गटाला मिळू शकते. गटबाजीमुळे मराठी नगरसेवकांना चारपैकी तीन स्थायी समित्या गमवाव्या लागल्या आहेत. आता आरक्षणामुळे महापौरपद गमवावे लागणार आहे. प्रभाग 55 चे नगरसेवक बसाप्पा चिक्कलदिन्नी व प्रभाग 56 च्या नगरसेविका सुचेता गंडगुद्री हे आता महापौरपदाचे प्रबळ दावेदार बनले आहेत. बेळगाव महापालिका अस्तित्वात आल्यापासून एकदाही महापौर किंवा उपमहापौरपद अनुसूचीत जमातीसाठी आरक्षीत ठेवण्यात आले नव्हते. मराठी गटात या प्रवर्गातील उमेदवार नसल्यामुळेच जाणीवपूर्वक हे आरक्षण लागू करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. मराठी भाषिकांना सत्तेपासून रोखण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात आल्याची जोरदार चर्चाही सुरू झाली आहे. फेब्रुवारी अखेरीस महापौर संज्योत बांदेकर यांचा कार्यकाळ संपणार आहे. मार्च महिन्यात महापौर निवडणूक होणार आहे.

Web Title: belgaum news The Mayor of Belgaum reserved