बेळगावः महापौर संज्योत बांदेकर यांनी सोडला आपला कक्ष

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

बेळगावः अनेकदा सूचना देवूनही आयुक्त व कौन्सील सेक्रेटरीनी असुविधा दूर न केल्यामुळे आज (मंगळवार) महापौर संज्योत बांदेकर यांनी आपला कक्ष सोडला. त्यानी महापालिका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील सत्ताधारी गटनेत्यांच्या कक्षातून आपले कामकाज सुरू केले.

आयुक्त शशीधर कुरेर, कौन्सील सेक्रेटरी लक्ष्मी निपाणीकर व महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या देखभालीची जबाबदारी असलेले सहाय्यक कार्यकारी अभियंते रमेश न्यामगौडर यांना कक्ष सोडणार असल्याची माहिती महापौरानी दिली. मंगळवारी दुपारी त्यानी सत्ताधारी गटनेत्यांच्या कक्षात स्थलांतर केले.

सोमवारी झालेल्या सर्वसाधारण बैठकीत आयुक्त-अधिकारी व नगरसेवकांमध्ये सन्मानाच्या मुद्‌द्‌यावरून खडाजंगी झाली होती. सूचना देवून दीड महिना झाला तरी टेबल बेल न मिळाल्यामुळे उपमहापौर नागेश मंडोळकर यांनी स्टोअर विभागाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला होता. दुसऱ्याच दिवशी महापौरांनी आपला कक्ष सोडल्यामुळे नगरसेवक व अधिकारी यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. महापौरांनी सत्ताधारी गटनेते पंढरी परब व गटातील नगरसेवकांशी चर्चा करून हा निर्णय घेतला. पण या निर्णयाची माहिती मिळाल्यानंतर अधिकाऱ्यानी त्यांना कक्ष न सोडण्याची विनंती केली. पण दिलेल्या सूचनांकडे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करीत महापौर कक्ष सोडण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्या.

कक्षातील असुविधा दूर न केल्यामुळे महापौरांनी कक्ष सोडल्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. यामुळे महापालिका आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच नाचक्की झाली आहे.

महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (ता.14) महापौर कक्षात शॉर्टसर्कीटमुळे आग लागली होती. शॉर्ट सर्कीटमुळे तेथील वातानुकूल यंत्रणेत बिघाड झाला, महापौर कक्षात संपूर्ण धुराचे साम्राज्य पसरले. महापौरांच्या उपस्थितीतच ही घटना घडली. त्यानंतर लगेचच महापौरांनी कौन्सिल सेक्रेटरी व सहाय्यक कार्यकारी अभियंत्याना या घटनेची माहिती दिली. तेथील वातानुकूल यंत्रणा तातडीने दुरूस्त करण्यास सांगीतले. पण मंगळवारपर्यंत अधिकाऱ्यांनी काहीच केले नाही. महापौर कक्षात आसनव्यवस्थेची समस्या आहे. महापौरांना भेटण्यासाठी कोणी आलेच तर त्याना बसण्यासाठी पुरेशा खुर्च्या नाहीत. तेथील मॅटची दुरावस्था झाली आहे, कक्षात दुर्गंधीचीही समस्या आहेत.

वातानुकूल यंत्रणा नसेल तर कक्षातील तापमान वाढते. ती यंत्रणा बंद असल्यामुळे सोमवारी सर्वसाधारण बैठकीच्या दिवशी कक्षाच्या सर्व खिडक्‍या उघड्या ठेवाव्या लागल्या होत्या. महेश नाईक महापौर असलेपासून कक्षातील असुविधा दूर करण्याची मागणी अधिकाऱ्यांकडे केली जात आहे. आयुक्त कक्ष व अन्य कक्षांची अंतर्गत सजावट करण्यात आली, पण महापौर कक्षाकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. पण आता असुविधा वाढल्यामुळे महापौर बांदेकर यानी थेट कक्षच बदलण्याचा निर्णय घेतला. महापौर कक्षातील सर्व असुविधा दूर झाल्याशिवाय पुन्हा तेथे न जाण्याचा निर्णय महापौरांनी घेतला आहे. महापौरांच्या या धाडसी निर्णयाची पालिका वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: belgaum news Mayor Sanjyot Bandekar left her office