संघाकडून उचल न झाल्याने दूध ओतले रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

चिक्कोडी - चिक्कोडी, अथणी, रायबाग व हुक्केरी तालुक्‍यातील लाखो लिटर दूध रोज कोल्हापूर येथील गोकुळ दुध संघास पुरवठा करण्यात येते. पण गेल्या दोन दिवसांपासून संघाकडून दूधाचा स्वीकार करण्यात येत नसल्याने तालुक्‍यातील शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. मुगळी येथील शेतकऱ्यांनी हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतून निषेध व्यक्त केला.

गोकुळ दूध संघाकडून सीमावर्ती भागातील लाखो लिटर दूध रोज नेण्यात येते. पण अचानक गायीच्या दूधाचा दर कमी करण्यात आला. शिवाय या भागातील दूधाची उचल बंद केल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. 

"गेल्या 15 वर्षांपासून दूधाचा गोकुळला पुरवठा करीत आहोत. पाण्याचा दर प्रती लिटर 20 रुपये असताना केवळ 17 रुपये प्रतिलिटर दराने गायीचे दूध विकत घेण्यात येत आहे. दर कमी असूनही आता तर त्यांनी दूधाची उचलच बंद केल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.'

- मल्लाप्पा बडिगेर

गोकुळकडून दूधाची उचल बंद झाली असून शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी कर्नाटक सरकारच्या केएमएफच्यावतीने दूधाची उचल करण्यासाठी साकडे घालण्यात येत आहे. यावेळी राजू हरगण्णवर, महांतेश हरगण्णवर, तम्माण्णा बंबलवाडे, कल्लाप्पा बडिगेर उपस्थित होते. 

Web Title: Belgaum News milk purchase issue