मंत्री डी. कें. शिवकुमार यांच्या अडचणीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

बंगळूर - प्राप्तिकर फसवेगिरीच्या आरोपात सापडलेले मंत्री डी. के. शिवकुमार यांच्याविरुद्ध हवाला व्यवहार केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. आर्थिक गुन्हे विशेष न्यायालयात १८ रोजी दाखल प्रकरणात दिल्लीतील फ्लॅटमध्ये सापडलेले बेहिशेबी ८.५९ कोटी रुपये अनधिकृत व्यवहारातून मिळविले असून ते हवाला नेटवर्कमधून साठल्याचा आरोप प्राप्तिकर खात्याने न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे.

ऑगस्ट २०१७ मध्ये प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी दिल्लीतील तीन फ्लॅटस्‌ व राज्य कर्मचारी वसतिगृहावर एकाच वेळी छापे घातले होते. यावेळी सापडलेली रक्कम प्रथम शिवकुमार यांची असल्याचा आरोप केला आहे. या रकमेचे कोणतेच पुरावे सापडलेले नाहीत. इतर संशयित उद्योजक सचिन नारायण, शर्मा ट्रॅव्हल्सचे मालक सुनील शर्मा, कर्नाटक भवनाचे सहाय्यक व्यवस्थापक अंजनेय हनुमंतय्या व राजेंद्रन यांच्यामार्फत ही रक्‍कम विविध व्यवहारासाठी वापरण्यात येत होती, असा आरोप झाला आहे.

डी. के. शिवकुमार यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेले प्राप्तिकर प्रकरण हे द्वेषाचे राजकारण असल्याचे वाटते. कायदेशीर लढाई लढण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. शिवकुमारसुद्धा कायद्याची लढाई लढत आहेत. त्यामुळे राजीनामा घेण्याची गरज नाही.
- एच. डी. कुमारस्वामी,
मुख्यमंत्री

पैसे साठवण्यासाठी फ्लॅटस्‌
दिल्लीतील तिन्ही फ्लॅटस्‌ची जबाबदारी अंजनेय यांच्यावर होती. सुनील शर्मा व शिवकुमार अनेक वर्षांपासून पैशांचा संग्रह करण्यासाठी या फ्लॅटस्‌चा वापर करीत होते, अशी माहिती कर्नाटक भवनाचे अंजनेय यांनी प्रािप्तकर अधिकाऱ्यांच्या चौकशीत दिली आहे. शैलेंदर नावाच्या एका व्यक्तीने तीन वेळा १ कोटी, २.५० कोटी व १.५० कोटी रुपये शिवकुमार यांच्या सूचनेवरून आणून दिले होते. बाकीचे १.६० कोटी रुपये दुसऱ्या फ्लॅटवरून आणण्यात आले होते, अशी माहिती त्याने दिली आहे.

Web Title: Belgaum News Minister D. K. Shivkumar in Havala case