बसपचे कर्नाटकातही "माया'जाल 

संजय उपाध्ये
बुधवार, 6 जून 2018

बेळगाव - दक्षिण कर्नाटकात मोजक्‍याच जागा लढवून पैकी कोळ्ळेगलची जागा जिंकण्यात यशस्वी ठरलेल्या बहुजन समाज पक्षाने कर्नाटकात नवा इतिहास सुरु केला आहे. उत्तरप्रदेशच्या राजकारणात चाचपडत चाललेल्या बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांना कर्नाटकाने हात दिला आहे. त्यांच्या पक्षाचे कर्नाटकातील एकमेव आमदार असलेल्या एन. महेश यांना मंत्रीपद मिळाले आणि मायावती यांना दिलासा मिळाला. 

कर्नाटकाच्या अतिदक्षिणेकडील चामराजनगर जिल्ह्यातील कोळ्ळेगल हा तालुका केंद्र असला तरी विधानसभा मतदारसंघ आहे. गेल्या तीन-चार निवडणुकीत बसपने आपले असित्व दाखवून दिले आहे. या पार्श्‍वभूमीवर कर्नाटकात त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराने चक्क विधानसभेत प्रवेश केला आहे.

मायावतींना तर कर्नाटकात आपला आमदार निवडूण येईल आणि त्याला मंत्रीपद मिळेल, असे स्वप्नातही वाटेल नसेल. पण हा चमत्कार कोळ्ळेगलच्या मतदारांनी करुन दाखविला आहे. 
उत्तरप्रदेशमध्ये विधानसभेच्या 404 जागांपैकी केवळ 19 जागांवरच बसप प्रतिनिधीत्व करत आहे. तेथे पक्षाच्या आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी त्यांचा झगडा सुरु आहे. पण कर्नाटकातील विजय त्यांना अंधुकशी आशा असेल. वास्तविक आगामी राजकारणाची ही नांदी ठरु शकते. लोकसभेच्या निवडणुका वर्षभरात आहेत. त्यामुळे आतापासूनच भाजपच्या विरोधात सर्व पक्ष एकवटत आहेत. त्याच्या उभारणीला दिलासा देणारा हा कर्नाटकातील विजय ठरु शकते. 

कॉंग्रेसला पछाडत विजय 
अनुसुचित जातीसाठी राखीव असलेल्या कोळ्ळेगल विधानसभा मतदारसंघातून महेश यांनी विजय मिळविला आहे. 1957 पासून दहा वेळा कॉंग्रेसने येथे विजय मिळविला आहे. तर एकदा पोटनिवडणूक भाजपने जिंकली आहे. कॉंग्रेसला पछाडत बसपचा हा विजय मोठाच म्हणावा लागेल. यावेळी त्यांनी 31 हजार मते घेतली. तर गेल्यावेळी त्यांनी 37 हजारावर मते घेतली होती. मतविभागणीचा फायदा त्यांना झाला. 

विधानसभा मतदारसंघ असा 

  • एकूण मतदार - एक लाख 93 हजार 
  • रेशीम उत्पादनात लक्षणीय कामगार 
  • चार-पाच निवडणुका बसप लढविल्या 
  • कर्नाटक विधानसभेत पहिल्यांदाच यश 
Web Title: Belgaum News ministry to N. Mahesh