पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना भर चौकीत गोळ्या घाला - खासदार सुरेश अंगडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

बेळगाव - पाकिस्तान झिंदाबाद अशी देश विरोधी घोषणा देणाऱ्यांना भर चौकात गोळ्या घाला, अशी मागणी खासदार सुरेश अंगडी यांनी आज (ता.10) पत्रकार परिषदेत दिली. 

बेळगाव - पाकिस्तान झिंदाबाद अशी देश विरोधी घोषणा देणाऱ्यांना भर चौकात गोळ्या घाला, अशी मागणी खासदार सुरेश अंगडी यांनी आज (ता.10) पत्रकार परिषदेत दिली. 

अंगडी यांनी बेळगाव उत्तरचे आमदार फिरोज सेठ आणि कार्यकर्ते यांच्यावर माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पण, हा गंभीर गुन्हा आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमेवर सर्जिकल स्वरूपात कारवाई करून आतंकवाद्याचा खात्मा करत आहेत. दुसरीकडे आमदार फिरोज सेठ पाकिस्तान झिंदाबाद घोषणा देणाऱ्यांना सांभाळत आहेत. ही देशासाठी शोकांतिका आहे. त्यामुळे पाकिस्तान झिंदाबाद अशी घोषणा देणाऱ्या भर चौकात गोळया घाला, अशी मागणी अंगडी यांनी केली आहे.

पाकिस्तान झिंदाबाद अशी घोषणा येथील गांधीनगर येथे दिली असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

Web Title: Belgaum News MP Suresh Angadi Press