हिरण्यकेशीही गाळमुक्‍त होणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

बेळगाव  - मार्कंडेयपाठोपाठ आता हिरण्यकेशी नदीतील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. हुक्केरी तालुक्‍यातील बडकुंद्रीतून शनिवारी (ता. १९) कामाला प्रारंभ करण्यात आला. हे काम एक महिना चालणार असून त्याला रोहयाची जोड देण्यात आली आहे. जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी एन. रामचंद्रन यांनी हे काम हाती घेतले आहे. 

हुक्केरी तालुक्‍यात हिरण्यकेशी नदीची लांबी २२ किलोमीटर आहे. बडकुंद्रीतील बॅरेजपासून अडीच किलोमीटर अंतरापर्यंतच्या नदी पात्रातील गाळ पहिल्या टप्प्यात काढला जाणार आहे. या कामासाठी परिसरातील रोहयोच्या २३ कामगार संघटनांना सामावून घेतले असून अडीच कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. सुमारे १० किलोमीटर दूरवरून यासाठी रोहयो मजूर आणले जात आहेत. त्यांना रोहयो मजुरीसह १० टक्के अतिरीक्त परिवहन खर्च दिला जाणार आहे. पहिले तीन दिवस सुमारे दीड हजार मजूर काम करणार आहेत. रोहयो मजुरांना २४९ रुपये मजुरी मिळत आहे.

गाळ काढून भूजल पातळी वाढविण्याच्या या कामास ग्रामस्थांनीही सहकार्य केले आहे. अनेक युवक संघटना आणि स्थानिक लोकांना त्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. मार्कंडेय नदीतील गाळ काढतेवेळी रोहयो मजुरांसह शहरातील अनेक संघटनांनी उस्फूर्त सहभाग घेत गाळ काढण्याचे काम केले होते. या कामाची देशभरात चर्चा झाली होती. केंद्र सरकारनेही याची दखल घेतली होती. आता त्यापाठोपाठ हिरण्यकेशीचे काम हाती घेतले आहे. 
 
एक नजर

  •     पावसाळ्यापूर्वी काम संपविण्याचा निर्धार 
  •     अडीच कोटी रुपये खर्च अपेक्षित
  •     रोहयोच्या २३ संघटनांकडून काम
  •     प्रत्येक संघटनेत २५ मजुरांचा समावेश
  •     रोज सुमारे ५७५ मजूर काढताहेत गाळ
  •     ६५ वर्षांवरील व्यक्तीला अर्ध्या दिवसासाठी पूर्ण दिवसाची मजुरी
Web Title: Belgaum News Mud Excavation in Hiranyakeshi