वाईन्स शाॅपमध्ये चोरांकडून सफाई कामगाराचा खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

चिक्कोडी - बोरगाव येथे वाइन्स शाॅपमध्ये काल गुरूवारी (ता. १९) रात्री चोरट्याने दुकान फोडून सफाई कामगाराचा खून केल्याची घटना घडली आहे. सिद्धलिंग (वय ४०) असे मृताचे नाव आहे.

चिक्कोडी - बोरगाव येथे वाइन्स शाॅपमध्ये काल गुरूवारी (ता. १९) रात्री चोरट्याने दुकान फोडून सफाई कामगाराचा खून केल्याची घटना घडली आहे. सिद्धलिंग (वय ४०) असे मृताचे नाव आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की , हुपरी-बोरगाव मार्गावर मनोहर चावला यांच्या मालकीचे भारत वाईन्स हे शाॅप आहे. त्यांच्याकडे सिद्धलिंग हा कामगार होता. रात्री चोरट्यांनी वाईन्स शाॅप फोडले. या चोरांनी सिद्धलिंगचे हातपाय बांधून त्यांच्यावर धारधार शस्त्राने वार केले. यात त्याचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती कळताच सदलगा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक एम. बी. बिरादार घटनास्थळी दाखल झाले असून  ते अधिक तपास करीत आहेत.

re>
Web Title: Belgaum News murder in Borgaon