निपाणी नगरपालिका हरकतींसाठी 27 जून अखेर मुदत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

निपाणी - नगरपालिकेने बनविलेल्या मतदार यादीला तहसीलदार कार्यालयाने अंतिम मंजुरी दिल्याने पालिकेने मंगळवारी (ता. 12) अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली. आता प्रसिध्द केलेल्या मतदार यादीत त्रुटी असतील तर शहरवासीयांना 27 जूनपर्यंत तहसीलदार कार्यालयाकडे हरकती दाखल करता येणार आहेत. शहरातील 31 प्रभागांची अंतिम यादी पालिकेत उपलब्ध असून इच्छुकांना त्याची नक्कल प्रत झेरॉक्‍स सेंटरमधून काढून घेता येणार आहे.

मतदार यादी बनविण्याचे काम व नगरपालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्याने नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. येथे 31 प्रभाग असून सर्व प्रभागातील 49 हजार 932 मतदारांचा समोवश 51 मतदान केंद्रात (बूथ) मध्ये केला आहे. नगरपालिकेने 2018 च्या निवडणुकीसाठी मतदार यादी बनवून ती तहसीलदारांच्या मंजुरीसाठी पाठवली होती. सोमवारी (ता. 11) सायंकाळी यादीला तहसीलदारांची मंजुरी मिळाली.

मतदारांनी आपले नाव आपल्याच प्रभाग यादीत आहे की नाही, याची खात्री करण्याचे आवाहन पालिकेने आहे. राजकीय नेते, कार्यकर्ते, आजी-माजी नगरसवेकांना मतदार यादीची प्रतिक्षा होती. यादी प्रसिध्दीमुळे पालिकेसह आवारातील झेरॉक्‍स केंद्रात निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांसह कार्यकर्त्यांची यादी उपलब्ध करण्यासाठी गर्दी होत आहे. काही मतदारांचा समावेश चुकीच्या प्रभागात झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. यादी उपलब्ध झाल्याने चुकीबद्दल शहानिशा करता येणार आहे.

आरक्षणाबद्दल अंतिम मुदत

यापूर्वी 31 प्रभागांचे आरक्षण जाहीर करून त्यावर हरकती मागविल्या होत्या. उद्या बुधवारी (ता. 13) जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती नोंदविण्याची अंतिम मुदत आहे.

"मतदार यादीतील चुकीच्या दुरुस्तीसाठी 27 जूनपर्यंत तहसीलदारांकडे हरकती दाखल करता येतील. मतदार यादीची नक्कल प्रत पालिकेसमोरील झेरॉक्‍स केंद्रात ती मिळू शकेल."

- डी. एस. हरदी,
आयुक्त, निपाणी नगरपालिका 

Web Title: Belgaum News Nipani Nagarpalika election