उत्तर कर्नाटकातील पहिली ह्रदयरोपण शस्त्रक्रिया यशस्वी

मल्लिकार्जुन मुगळी
शनिवार, 3 मार्च 2018

बेळगाव : उत्तर कर्नाटकातील पहिली ह्रदयरोपण शस्त्रक्रिया येथील डॉ. प्रभाकर कोरे केएलईएस हॉस्पीटलमध्ये करण्यात आली आहे. हॉस्पीटलचे वैद्यकीय संचालक डॉ. एम. व्ही. जाली व डॉ. प्रभाकर कोरे यानी पत्रकार परीषदेत ही माहिती दिली.

कर्नाटकात बंगळूर वगळता अन्य कोठेही अशी शस्त्रक्रिया झालेली नाही. 32 वर्षीय वीरगौडा पाटील यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. 20 फेब्रुवारी रोजी हृदयरोपण शस्त्रक्रिया झाली असून, ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचा दावा डॉ. रिचर्ड साल्ढाणा यानी केला.

ब्रेन हॅमरेजमुळे त्रस्त 42 वर्षीय सविता पवार या महिलेचे ह्रदय त्यांच्या कुटुंबियानी दान करण्याचा निर्णय घेतला. त्या ह्रदयाचे रोपण वीरगौडा पाटील यांच्यावर करण्यात आले. खासदार डॉ. प्रभाकर कोरे यानी या शस्त्रक्रियेची माहिती दिली. अवयावदान हे अत्यंत विधायक कार्य आहे, त्यासाठी नागरीकानी पुढे यावे असे आवाहन केले.

मंगावती (ता. अथणी) येथील वीरगौडा पाटील पाटील याला या शस्त्रक्रियेमुळे पुनरूज्जीवन मिळाल्याचे कोरे म्हणाले. केवळ पाच लाख रूपयांमध्ये ही शस्त्रक्रिया केल्याचेही ते म्हणाले.

Web Title: belgaum news north karnataka heart operation