आयपीएल बेटिंग प्रकरणी तरुणाला अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

बेळगाव - आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणाऱ्या एकाला टिळकवाडी पोलिसांनी काल (ता. २५) अटक केली. संतोष बसवराज हुग्गी (वय ३५ रा. अनगोळ) असे संशयिताचे नाव आहे.

बेळगाव - आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणाऱ्या एकाला टिळकवाडी पोलिसांनी काल (ता. २५) अटक केली. संतोष बसवराज हुग्गी (वय ३५ रा. अनगोळ) असे संशयिताचे नाव आहे.

त्याच्याकडून अकरा हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. आयपीएल सामन्यांवर बेटिंग प्रकरणी एखाद्याला अटक झाल्याचे हे यंदा पहिलेच प्रकरण आहे.

काल रात्री कोलकाता नाईट रायडर्स आणि सनराईज हैद्राबाद या संघात आयपीएलचा उपांत्य सामना सुरु होता. हा सामना चुरशीचा अन्‌ रंगतदार झाला. सामन्यावर बेटींग लावण्यात येत आहे. बेटींगची रक्‍कम अनगोळमधील एकजण स्वीकारत आहे, अशी खात्रीलायक माहिती टिळकवाडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी अनगोळमध्ये छापा टाकून संतोषला अटक केली. त्याच्याकडून रोख रक्‍कमही जप्त करण्यात आली. या प्रकरणी टिळकवाडीचे पोलिस निरीक्षक एन. मृत्युजंय अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Belgaum News one arrested in IPL Baiting