आमदाराचा अपप्रचार केल्याच्या आरोपातून एकाची अर्धनग्न धिंड 

संजय सूर्यवंशी
मंगळवार, 27 मार्च 2018

बेळगाव - आमदाराचा अपप्रचार करत असल्याच्या आरोप करत एकाची अर्धनग्न धिंड काढून मारहाण केल्याची घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. महंमदरफिक देसाई (50, रा. चन्नम्मा सोसायटी, श्रीनगर) असे मारहाण झालेल्या व्यक्तिचे नाव आहे.

बेळगाव - आमदाराचा अपप्रचार करत असल्याच्या आरोप करत एकाची अर्धनग्न धिंड काढून मारहाण केल्याची घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. महंमदरफिक देसाई (50, रा. चन्नम्मा सोसायटी, श्रीनगर) असे मारहाण झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. त्याला प्रथम सिव्हील हॉस्पिटल परिसरात त्यानंतर चन्नम्मा चौकात मारहाण करण्यात आली. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयात नेऊनही त्यांना मारहाण करण्यात आली. याबाबत देसाई यांनी एपीएमसी पोलिसांत फिर्याद दिली आहे. 

पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार आमदार फिरोज शेठ यांचा अपप्रचार करत असल्याच्या रागातून ही मारहाण झाल्याचे देसाई यांनी म्हटले आहे. या प्रकरणी तौसिफ अलवाडकर, अबु मुल्ला, इम्तियाज या तिघांसह सुमारे 25 जणांविरोधात एपीएमसी पोलिसांत फिर्याद दाखल झाली आहे. 

महंमद रफिक देसाई यांच्याकडे जिल्हा रूग्णालयातील रूग्णांना सकाळचा नाष्टा व जेवण पुरविण्याचे कंत्राट आहे. आज सकाळी साडेआठच्या सुमारास ते जिल्हा रूग्णालय आवारात नाष्टा देण्यासाठी स्वतःच्या मालकीच्या मोटारीतून आले. यावेळी उपरोक्त संशयितांसह सुमारे 25 जणांनी त्यांना मारहाण केली असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Belgaum News One man assault by mass