मंत्रिपद एक; इच्छुक चार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

बेळगाव - मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा शपथविधी झाला. त्यांनी विश्‍वासदर्शक ठरावही जिंकला. आता सर्वांच्या नजरा मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागल्या आहेत. बेळगाव जिल्ह्यात काँग्रेसच्या वाट्याला किमान एक मंत्रिपद असून, ते मिळविण्यासाठी चौघांमध्ये जोरदार रस्सीखेच आहे. जिल्ह्यातून कुणाला मंत्रिपद मिळणार याबाबत औत्सुक्‍य निर्माण झाले आहे.

खातेवाटपावरून सत्ताधारी काँग्रेस व धजदमध्ये वाद धुमसत आहे. काँग्रेसच्या वाट्याला २२ तर धजदला १२ मंत्रिपदे मिळणार आहेत, पण काँग्रेसमध्ये मंत्रिपदासाठी इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे, मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे. पक्षातील ३५ पेक्षा अधिक आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. यापैकी किती जणांना मंत्रिपद द्यायचे, कुणाची नेमणूक महामंडळावर करायचीआणि किती जणांना पक्ष संघटनेत सक्रिय करून घ्यायचे, याची आखणी करण्यात पक्षश्रेष्ठी गुंतले आहेत, तर इच्छुक लॉबिंगमध्ये व्यस्त आहेत.

बेळगाव जिल्ह्यात काँग्रेसच्या वाट्याला एक मंित्रपद येण्याची 
शक्‍यता आहे. पण, त्यात वाढही होऊ शकते. बेळगाव आणि चिक्कोडीसाठी प्रत्येकी एक मंत्रिपद देऊन पक्ष इच्छुकांचे समाधान करू शकतो किंवा पूर्ण जिल्ह्यासाठी एकच मंत्री ठेवला जाऊ शकतो. जिल्ह्याला एकच मंत्रिपद मिळेल, अशी शक्‍यता गृहीत धरुन इच्छुक प्रयत्न करत आहेत. इच्छुकांची संख्या चार आहे. त्यापैकी किती जणांना मंत्रिपद प्राप्त होणार आहे, याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे.

सतीश जारकीहोळी आघाडीवर
मिळालेल्या माहितीनुसार मंित्रपदाच्या शर्यतीत आमदार सतीश जारकीहोळी यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्यासोबत माजी पालकमंत्री रमेश जारकीहोळी, गणेश हुक्केरी व महिला गटामधून लक्ष्मी हेब्बाळकर यांची नावे चर्चेत आहेत. मंित्रपद आपल्या वाट्याला पाडून घेण्यासाठी आमदार सक्रिय आहेत. त्यासाठी शक्‍तिप्रदर्शनही केले जात आहे. काहीजण बंगळुरात तळ ठोकून आहेत, तर काहींनी दिल्ली गाठली आहे.

Web Title: Belgaum News one minister seat and four in race