बेळगावात निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पोलिसांच्या बदल्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 मार्च 2018

बेळगाव - राज्यातील पोलीस उपअधीक्षक व निरीक्षकांच्या बदल्यांची यादी दोन टप्प्यात जाहीर झाली आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यास अद्याप एक-दिड महिन्याचा अवधी आहे. तत्पूर्वीच या अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश निघाल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

बेळगाव - राज्यातील पोलीस उपअधीक्षक व निरीक्षकांच्या बदल्यांची यादी दोन टप्प्यात जाहीर झाली आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यास अद्याप एक-दिड महिन्याचा अवधी आहे. तत्पूर्वीच या अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश निघाल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. कारण, दरवेळच्या निवडणुकीवेळी आचारसंहिता लागल्यानंतर अथवा वेळापत्रक जाहीर होण्याआधी पंधरा दिवस बदलीचा आदेश निघतो. परंतु, यावेळी आचारसंहिता तर दूरच अद्याप निवडणुकीची तारीख जाहीर झालेली नसताना पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. 

गेल्या महिनाभरापासून प्रतिक्षेत असलेल्या शहर व जिल्ह्यातील पोलिसांची अखेर बदली झाली आहे. निवडणूक आली की किमान दोन महिने पोलिसांना अन्यत्र बदलून जावे लागते. बदली झालेले अधिकारी जसजसे येतील, तसे त्यांच्याकडे कार्यभार सोपवून अधिकारी त्यांच्या बदलीच्या ठिकाणी जातील. ही प्रक्रीया पुढील आठ दिवस चालणार आहेत. परंतु, लवकरच आदेश आल्यामुळे पोलीस अधिकारी बदलीच्या मूडमध्ये आहेत. 

*निवडणूक दूर, बदली आधी 
सर्वांच्या अपेक्षेनुसार 15 मार्चनंतर आचारसंहिता लागू होईल व त्या काळातच बदलीचे अध्यादेश निघतील, असे वाटत होते. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 15 एप्रीलनंतर केंद्रीय निवडणूक आयुक्त राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करतील, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्यास अद्याप दिड महिना बाकी आहे. मग पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आताच का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

*कायदा काय सांगतो 
किमान तीन वर्षे एकाच ठिकाणी सेवा बजावलेले व जिल्ह्यातील स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांची बदली करावी, असे निवडणूक आयोगाचा कायदा सांगतो. यामागील कारण म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणत्याही उमेदवाराची बाजू घेऊन त्यांना मदत करता येऊ नये, त्यांना या परिसराची फारशी ओळख होऊ नये, त्यांनी फक्त कायदा व सुव्यवस्थेचे पालन होण्यासाठी बंदोबस्त ठेवावा, असा हेतू असतो. परंतु, आताच बदल्या झालेल्या असल्यामुळे अधिकाऱ्यांनी त्या परिसराची सर्व माहिती करून घ्यावी, यासाठी झालेली आहे का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

""निवडणूक काळात बदली होऊन गेलेल्या परिसराची पोलीस अधिकाऱ्याला ओळख होणे गरजेचे असते. तेथील सर्व परिसर जाणून घेऊन बंदोबस्ताचे नियोजन करता यावे, यासाठी यावेळी लवकर बदल्या केलेल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्याचा ज्या परिसराशी संबंध नाही, अशा ठिकाणी त्यांना पाठविले जाते. तेथील निवडणूक पारदर्शी व्हावी, हा यामागील हेतू आहे'' 
डॉ. डी. सी. राजप्पा,
पोलीस आयुक्त 

शहर व जिल्ह्यातील बदललेले पोलीस निरीक्षक 
नाव........सध्याचे ठिकाण.............बदलीचे ठिकाण 
नारायण स्वामी*बेळगाव ग्रामीण*सीसीबी,हुबळी-धारवाड 
जे. एम. कालीमिर्ची*एपीएमसी*हुबळी ग्रामीण 
सुलेमान तहसीलदार*सीसीआरबी*डीसीबी धारवाड 
यु. एच. सातेनहळ्ळी*खडेबाजार*एसबी, हुबळी-धारवाड 
आर. आर. पाटील*वाहतूक उत्तर*सीसीबी, हुबळी-धारवाड 
टी. एच. करीकल*वाहतूक दक्षिण*राज्य गुप्तचर विभाग 
ए. एस. गोदीगोप्प*सीसीआयबी*एसीबी 
सुदर्शन पट्टणकुडे*कॅम्प*कर्नाटक लोकायुक्त 
सुरेश लोहार*शहर एसबी*सीसीबी हुबळी-धारवाड 
रमेश गोकाक*काकती*राज्य गुप्तचर विभाग 
जावेद मुशापुरी*शहापूर*एसीबी 
मौनेश देशनूर*टिळकवाडी*राज्य गुप्तचर विभाग 
श्रीदेवी पाटील*महिला पोलीस ठाणे*बागलकोट महिला पोलीस ठाणे 
निरंजन पाटील*उद्यमबाग*पीटीएस, खानापूर 
एम. एम. नायकर*चिक्कोडी*कर्नाटक लोकायुक्त 
आनंद वाघमोडे*डीएसबी, *डीएसबी विजापूर 
थानाप्पगोळ*गोकाक*डीसीआयबी विजापूर 
एस. आर. कट्टीमणी*डीसीआयबी*पीटीएस खानापूर 
किशोर भरणी*निपाणी*आयएसडी 
संदीपसिंग मुरगोड*हुक्केरी*कर्नाटक लोकायुक्त 
 

Web Title: Belgaum News police transfer before election