बारावीच्या निकालात बेळगाव, चिक्कोडी शैक्षणिक जिल्हे 'ढ'

मिलिंद देसाई  
सोमवार, 30 एप्रिल 2018

बेळगाव - शिक्षण खात्याने सोमवारी बारावीचा निकाल जाहिर केला असून निकालामध्ये बेळगाव शैक्षणिक जिल्हाची मोठी घसरण झाली. बेळगाव शैक्षणिक जिल्हा २९ व्या क्रमांकावर घसरला असून चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा राज्यात शेवटचा क्रमांकावर आहे. त्यामुळे हे दोन्ही शैक्षणिक जिल्हे बारावीच्या निकालात 'ढ' ठरले आहेत.

यंदा राज्याच्या एकूण निकालामध्येही घसरण झाली आहे. राज्याचा निकाल फक्त 59.56  इतका लागला आहे तर बेळगाव शैक्षिणक जिल्ह्यात 54.28 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. राज्यात मंगळुर जिल्ह्याने प्रथम क्रमांक तर उडपी जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आला. पास होणाऱ्यामध्ये विद्यार्थीनींची संख्या अधिक आहे. उद्या सर्व पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये निकाल उपलब्ध होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर निकाल पाहण्यासाठी सायबर कॅफेमध्ये गर्दी झाली होती विधानसभा निवडणुकीमुळे बारावीची परीक्षा लवकर घेण्यात आली होती व निकालही लवकर जाहीर करण्यात आला आहे.
 
Web Title: Belgaum News Pre University College exam result