रुळाची दुरुस्ती; रेल्वे धावल्या उशिरा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

बेळगाव - बेळगाव-सांबरा दरम्यान रेल्वे रुळ दुरुस्तीसाठी आज (ता. 30) सकाळी काहीकाळ रेल्वे उशिरा धावल्या. रुळाच्या दुरुस्तीनंतर रेल्वे पूर्ववत झाल्या आहेत, अशी माहिती नैऋत्य रेल्वे कार्यालय अधिकारी आणि रेल्वे पोलिसांनी दिली. 

बेळगाव - बेळगाव-सांबरा दरम्यान रेल्वे रुळ दुरुस्तीसाठी आज (ता. 30) सकाळी काहीकाळ रेल्वे उशिरा धावल्या. रुळाच्या दुरुस्तीनंतर रेल्वे पूर्ववत झाल्या आहेत, अशी माहिती नैऋत्य रेल्वे कार्यालय अधिकारी आणि रेल्वे पोलिसांनी दिली. 

रेल्वे कर्मचारी आज (ता.30) सकाळी नेहमीची तपासणी करत होते तेव्हा त्यांना बेळगाव-सांबरा दरम्यान रुळात फट पडल्याचे दिसून आले. वेल्डिंगद्वारे रेल्वे रुळाच्या दुरुस्तीची गरज असल्याचे स्पष्ट झाले. त्यासाठी तातडीने रेल्वे रुळ दुरुस्ती पथकाला बोलावून घेतले आणि रुळाची दुरुस्ती करून घेतली. त्यानंतर रेल्वे पूर्ववत धावू लागल्या. पण, या प्रकाराने रेल्वे उशिरा धावल्या. प्रवाशांना नियोजित ठिकाणी पोचण्यासाठी उशिर झाला आहे. 

सकाळी  9 ते 11 या कालावधीत बेळगाव-लोंढा पॅसेंजर, बेळगाव-हुबळी पॅसेंजर, दादर-यशवंतपूर एक्‍सप्रेस धावते. पण, या दरम्यान रेल्वे रुळाची दुरुस्तीचे काम हाती घेतले. यामुळे बेळगाव, खानापूर येथून मिरजेला जाणाऱ्या सर्व रेल्वे आणि मिरज, घटप्रभा मार्गाने बेळगावकडे येणाऱ्या सर्व रेल्वे उशिरा धावू लागल्या. एक्‍सप्रेस, पॅसेंजर रेल्वे सर्वच गाड्या अर्धा ते 1 तास उशिरा धावल्या आहेत. वेगवेगळ्या स्थानकात रेल्वे थांबून होत्या, अशी माहिती रेल्वे पोलिस, रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. पण, सकाळी अकरा वाजता रुळाची दुरुस्ती झाल्यानंतर सर्व रेल्वे पूर्ववत धावू लागल्या. 

Web Title: Belgaum News rails running late due to Rail track maintenance