बेळगावची शिवजयंती चित्ररथ मिरवणूक चालली बारा तास

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

बेळगाव - शहराची शिवजयंती मिरवणूक यंदा 12 तास चालली. नेहमीप्रमाणे यंदाही खडक गल्लीचे चित्ररथ सर्वात शेवटचे ठरले. जमावबंदीचा आदेश आणि इतर राजकीय घडामोडींचा प्रभाव यावेळी शिवजयंती उत्सवावर राहिल्याने चित्ररथांची संख्या कमी होती. पण, प्रेक्षकांची गर्दी कायम राहिली. 12 तास चाललेली मिरवणुक शांततेच पार पडली. 

रात्री बारा वाजेपर्यंत अनेक मंडळांचे चित्ररथ एकामागोमाग होते. मात्र त्यानंतर त्यात खंड पडला. यावेळी रात्री रस्त्यावरील गर्दीही बारानंतर कमी होऊ लागली होती. धर्मवीर संभाजी चौकातील प्रेक्षक गॅलरीत मध्यरात्रीपर्यंत बसण्यासाठी सर्वांची गडबड सुरू होती. मारुती गल्लीपासून हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, समादेवी गल्ली परिसरात प्रेक्षकांची चित्ररथ पाहण्यासाठी अधिक गर्दी होती. यंदा अनेक मंडळांना तयारीसाठी वेळ अपुरा पडल्याने चित्ररथांमध्ये डॉल्बीचा दणदणाट जास्त राहिला. 

शहर पोलिस आयुक्त एम. चंद्रशेखर रात्रभर चित्ररथ मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते. रात्री अडीच वाजता व पहाटे साडेचार वाजता त्यांनी धर्मवीर संभाजी चौकात येऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला. यासह मिरवणुक मार्गावरही रात्रभर त्यांची फिरती सुरू होती. पोलिसांनी आधीच संवेदनशील मार्गांवर बॅरिकेड्‌स उभारून नाकाबंदी केली होती. मिरवणुक मार्गावर रात्रीही दुचाकींना प्रवेश बंदी ठेवण्यात आली होती. पोलिस सतर्कतेमुळे रात्री मिरवणुकीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला नाही. 

Web Title: Belgaum News Shivjayanti Chitrarath Miravnuk