बेळगाव-बंगळूर ही एकमेव विमानफेरीही बंद होण्याचे संकेत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

सांबरा - सांबरा विमानतळावरून सुरू असलेली स्पाईजसेटची बेळगाव-बंगळूर ही एकमेव विमानफेरीही बंद होण्याचे संकेत आहेत. स्पाईसजेट संकेतस्थळावर विमानफेऱ्यांचे बुकिंग केवळ ३० जूनपर्यंत उपलब्ध आहे. त्यामुळे ही फेरीही हुबळीकडे वर्ग होण्याची शक्‍यता आहे.

सांबरा - सांबरा विमानतळावरून सुरू असलेली स्पाईजसेटची बेळगाव-बंगळूर ही एकमेव विमानफेरीही बंद होण्याचे संकेत आहेत. स्पाईसजेट संकेतस्थळावर विमानफेऱ्यांचे बुकिंग केवळ ३० जूनपर्यंत उपलब्ध आहे. त्यामुळे ही फेरीही हुबळीकडे वर्ग होण्याची शक्‍यता आहे. ३७० एकर जमिनीचे संपादन करून सुमारे १५० कोटी रुपये खर्चून विस्तारीकरण करण्यात आलेल्या सांबरा विमानतळावर शुकशुकाट पसरणार असून सुमारे ५०० जणांवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळण्याची भीती आहे.

उडाण योजनेच्या लाभासाठी स्पाईस जेटने सांबरा विमानतळावरील चेन्नई, हैद्राबाद, मुंबई आणि बंगळूरची एक विमानफेरी १४ मेपासून हुबळीकडे स्थलांतर केली. बेळगाव-बंगळूर एक विमानफेरी सध्या कार्यरत आहे. बंगळूरहून दुपारी ३.३५ ला बेळगावला पोचणारे विमान ३.५५ ला माघारी परतते. या विमानफेरीचे बुकींग १ जुलैपासून थांबवण्यात आले आहे. स्पाईस जेटच्या संकेतस्थळावर केवळ ३० जूनपर्यंत बुकींग उपलब्ध आहे.

हुबळीहून इंडिगोचे बुकिंग सुरू 
स्पाईसजेट पाठोपाठ इंडिगो कंपनीने हुबळी विमानतळावरून विमानफेऱ्या सुरू करण्याचे निश्‍चित झाले आहे. आजपासून हुबळीहून बंगळूर, कोची, अहमदाबाद, चेन्नई, गोव्यासाठी तिकीट बुकिंग सुरू आहे. उडाण योजनेंतर्गत फायद्यासाठी स्पाईस जेटने बेळगावच्या विमानतळावरील चार विमानफेऱ्या हुबळीकडे वर्ग केल्या आहेत. स्पाईसजेट पाठोपाठ इंडिगोही हुबळी विमानतळावर सेवा देण्यासाठी स्पर्धेत उतरली आहे. पाच शहरांसाठी विमानफेऱ्या सुरू होणार असून आजपासून बुकींग सुरू झाले आहे. इंडिगोची कोची आणि गोव्याची फेरी २८ जूनपासून कार्यरत होणार असल्याची माहिती इंडिगोने आपल्या संकेत स्थळावर अपडेट केली आहे.

Web Title: Belgaum News Spice Jet service issue