पेपर देऊनही गैरहजेरी, तर काहींना शून्य गुण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

निपाणी - दहावीची परीक्षा देऊनही काही विद्यार्थ्यांची गैरहजेरी, तर काही विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाले आहेत. आज इंटरनेटवर दहावी निकाल जाहीर झाल्यावर ही बाब उघड झाली. त्यामुळे विद्यार्थी, पालकांतून प्रशासनाच्या गलथान कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

निपाणी शैक्षणिक तालुक्‍यातून सुमारे तीन हजार ८५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेचा निकाल आज इंटरनेटवर जाहीर झाला. पण, अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊनही काही विषयांच्या पेपरला त्यांची गैरहजेरी दाखवली आहे; तर काही विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाले आहेत. 

येथील गोमटेश स्कूलमधील समृद्धी अरुण मोकाशी हिला पाच विषयांत ९२ टक्के गुण मिळाले आहेत. मात्र, गणित विषयाचा पेपर देऊनही तिला या विषयात शून्य गुण मिळाल्याचे दिसते. याच शाळेतील संध्या साळुंखे हिच्याबाबतही असाच प्रकार घडला आहे. केएलई इंग्लिश मीडियम स्कूलमधील सागर माळगे व साहील हलगले यांचीही गणित विषयात अनुपस्थिती दाखवून त्यांना शून्य गुण मिळाल्याचे दिसत आहे. या प्रकरणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालय व बंगळूर परीक्षा बोर्डाकडे तक्रार दिली आहे. 

मला पाच विषयांत ९२ टक्के गुण मिळाले आहेत. गणितात मात्र शून्य गुण मिळाल्याचे इंटरनेटवरील निकालातून समजले. गणिताचा पेपर मी दिला असल्याने मला धक्का बसला. 
- समृद्धी अरुण मोकाशी, 

विद्यार्थिनी, गोमटेश स्कूल, निपाणी 

Web Title: Belgaum News SSLC result mistake