कर्नाटकात विद्यार्थ्यांना मिळणार बूट, सॉक्‍स

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

बंगळूर - यंदाच्या शैक्षणिक वर्षात पहिली ते १० वी पर्यंतच्या वर्गात शिकणाऱ्या ४४.५७ लाख विद्यार्थ्यांना एक जोड बूट व दोन जोड सॉक्‍स वितरित करण्यात येणार आहेत. शाळा सुधारणा समितीमार्फत (एसडीएमसी) त्यांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारने संबंधित शाळांच्या खात्यावर राज्यासाठी ११५ कोटी रुपये जमा केले आहेत.

राज्यातील एकूण ४२ हजार २९१ सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. शिक्षण खात्याने जारी केलेल्या परिपत्रकानुसार उत्तम दर्जाचे बूट व सॉक्‍सची खरेदी करून १५ जुलैपूर्वी त्यांचे वितरण करावे लागणार आहे. महिना अखेरपर्यंत योजनेची अंमलबाजावणी झाल्याचा अहवाल देण्याचे उपसंचालकांनी शाळांना कळविले आहे. सार्वजनिक शिक्षण खात्याचे संचालक (प्राथमिक) बी. के. बसवराजू यांनी यासंदर्भात सर्व शाळांना आदेशपत्र पाठविले आहे.

बूट-सॉक्‍ससाठी रक्कम 

  • १ ली ते ५ वी - २२५ रुपये
  • ६ वी ते ८ वी - २९५ रुपये
  • ९, १० वी - ३२५ रुपये

बूट व सॉक्‍स खरेदी प्रक्रियेत एक लाखापेक्षा अधिक रक्कम होणाऱ्या शाळेला ४ (जी) अंतर्गत सवलत मिळणार आहे. अशा शाळांनी कोड कोटेशनद्वारा खरेदी प्रक्रिया करावयास हवी. अशा प्रकारे बूट व सॉक्‍स पुरविणाऱ्या संस्थेची वाणिज्य कर खात्यात नोंदणी होणे आवश्‍यक आहे. त्यांना जीएसटी/टीन क्रमांक मिळालेला असला पाहिजे. यावर्षी स्थानिक पातळीवरील कोणत्याच कंपनीकडून शू-सॉक्‍सची खरेदी करण्यात येऊ नये, अशी अट घालण्यात आली आहे. 

Web Title: Belgaum News Students will get boots, socks in Karnataka