मुद्रांकवरील घरांना सक्रम बनवा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

महेश काशिद
गुरुवार, 22 मार्च 2018

बेळगाव - शासनाच्या अक्रम-सक्रम योजनेखाली शंभर रुपये बॉण्ड पेपरवर बांधलेल्या घरांना अधिकृत म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी आजी माजी नगरसेवक, मराठी संघटनेच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी झियाउल्ला एस. यांच्याकडे केली.

बेळगाव - शासनाच्या अक्रम-सक्रम योजनेखाली शंभर रुपये बॉण्ड पेपरवर बांधलेल्या घरांना अधिकृत म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी आजी माजी नगरसेवक, मराठी संघटनेच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी झियाउल्ला एस. यांच्याकडे केली. पण, झियाउल्ला यांच्या अनुपस्थित सहाय्यक अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले. 

शंभर रुपये बॉण्डपेपरवर बांधलेल्या घरांच्या विरोधात अलिकडे प्रादेशिक आयुक्त पी. ए. मेघण्णवर यांनी सुचना केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी शंभर रुपये बॉण्डपेपरवरील व्यवहाराला कायद्यात स्थान नाही. या स्वरुपाच्या व्यवहाराला नियमबाह्य मानले जाते. फसवणुकीच्या घटना यात घडतात. त्यामुळे तहसीलदारांनी या स्वरुपाचे व्यवहार थांबवून, भविष्यात तशा घटना घडणार नाहीत. त्याची काळजी ध्यावी. अशी सूचना केली आहे. त्यामुळे माजी महापौर सरीता पाटील, किरण सायनाक, उपमहापौर संजय शिंदे, माजी नगरसेवक नेताजी जाधव, नगरसेवक मनोहर हलगेकर, मोहन बेळगुंदकर, टी. के. पाटील, बाळासाहेब काकतकर, साजिद शेख, भारत कुरणे, मोतेश बारदेशकर, किरण गावडे, नारायण सावंत, यशोधरा महिला मंडळाच्या अध्यक्षा शांता मेलगे, सुजाता जेलूगडेकर, रुपा नावगेकरसह लोकप्रतिनिधी व नागिरकांनी आज जिल्हाधिकारी झियाउल्ला यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अनपस्थितीत सहाय्यक अधिकाऱ्यांनी निवेदनाचा स्वीकार केला आहे. त्यांच्याकडे घरे हटविण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे. 

आर्थिक दुर्बल, गरीबांनी 100 रुपये बॉण्डपेपरवर जमीन खरेदी करून घर बांधले आहे. बांधकामावर बुलडोझर चालविणे म्हणजे त्यांना बेघर करणे ठरेल. त्यामुळे त्यांना अभय द्यावे. शासनाच्या महत्वकांक्षी आक्रम सक्रम योजनेखाली घर मालकांना हक्कपत्र द्यावीत, अशी मागणी केली आहे. घरे हटविण्याचा प्रयत्न केल्यास व्यापक आंदोलन हाती घेण्याची येईल, असा इशारा दिला आहे. 

Web Title: Belgaum News Transform homes on stamps; Appeal to District Collector