बेळगावात फांदी पडून तीन वाहनांचे नुकसान 

संजय सूर्यवंशी
गुरुवार, 12 एप्रिल 2018

बेळगाव - मार्केट पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या वनविभागातील आंब्याच्या झाडाची फांदी तुटून पडली. यामध्ये दोन सरकारी मोटारी व एका अधिकाऱ्याच्या खासगी मोटारीचे मोठे नुकसान झाले. एका सरकारी मोटारीचा चालक जीपमध्ये बसला होता. अचानक कोसळलेल्या फांदीमुळे तो घाबरला. परंतु, त्याला कोणतीही इजा झाली नाही. 

वनविभागात अनेक जुनी झाडे आहेत. यापैकीच एक आंब्याचे झाड असून, त्याला मोठ्या प्रमाणात आंबे लागले आहेत. एका फांदीला लागलेल्या जादा आंब्यांचा भार सहन न झाल्याने आज दुपारी एकच्या सुमारास हे झाड कोसळले. यावेळी खानापूर येथील सहायक वनसंरक्षक यांची बोलेरो, विजापूर येथील वनाधिकाऱ्यांचे वाहन उभे होते. याशिवाय वनाधिकारी हुनगुंद हे सरकारी कामासाठी आपली खासगी मोटार घेऊन आले होते. भलीमोठी फांदी या तिन्ही वाहनांवर पडल्यामुळे वाहने खाली दबली गेली. याशिवाय एका जीपजवळ चालक थांबलेला होता. अचानक पडलेल्या फांदीमुळे तो घाबरला व तेथेच कोसळला. त्याला रूग्णालयात नेले परंतु, काहीही झाले नसल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

Web Title: Belgaum News tree fall on cars