बनावट नोटा प्रकरणी चिक्कोडीत दोघांना अटक

संजय उपाध्ये
मंगळवार, 13 मार्च 2018

चिक्कोडी - राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार चिक्कोडी पोलिस ठाण्यात बनावट नोटा बाळगल्या प्रकरणी एका विरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 

चिक्कोडी - राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार चिक्कोडी पोलिस ठाण्यात बनावट नोटा बाळगल्या प्रकरणी एका विरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, चिक्कोडी मंडल पोलिस निरिक्षणकांनी न्यायालयाचे तपासासाठीचे वाॅरंट घेऊन शहरातील प्रभुवाडीतील अशोक महादेव कुंभार यांच्या घराची झडती घेतली.  या तपासात दोन हजार रुपयांच्या ४१ बनावट नोटा आढळून आल्या. या नोटा बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी कुंभार यांना अटक केली आहे. तसेच त्यांच्या ताब्यातील ४१ बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी रायबाग तालुक्यातील कुडची येथील राजेंद्र बापू पाटील उर्फ देसाई यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर अधिक तपासासाठी पथक विजयापूरकडे रवाना झाले आहे. 

Web Title: Belgaum News Two arrested in Fake currency case

टॅग्स