...म्हणे गोव्याकडून कन्नडिगांवर अन्याय 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

बेळगाव - गोव्यातील कन्नडिगांवर अन्याय झाल्याचा कांगावा करत आणि कळसा भांडुरा प्रकल्पाचे पाणी उत्तर कर्नाटकाला देण्यास गोवा सरकार अडथळा आणत असल्याचा आरोप करत कन्नड नेते वाटाळ नागराज यांनी गोवा विधानसभेला ९ डिसेंबरला घेराव घालण्याची दर्पोक्ती केली आहे. 

सोमवारपासून (ता. १३) बेळगावात विधिमंडळाचे अधिवेशन सुरु झाले आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. कळसा भांडूरा प्रकल्पाचे पाणी उत्तर कर्नाटकाला मिळणे आवश्यक आहे. त्या पाण्यावर कन्नडिगांचा हक्क आहे. पण गोवा सरकार यामध्ये हस्तक्षेप करून सर्व पाणी आपल्या घश्यात घालत आहे. येथील शेतकरी पाण्याशिवाय आत्महत्या करत आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने तत्काळ उत्तर कर्नाटकाला पाणी मिळावे, याची दक्षता घ्यावी. पण तसे होताना दिसत नाही. याशिवाय काही दिवसांपासून गोव्यातील कन्नड लोकांवर गोवा सरकार अन्याय करत आहे. त्याविरोधात सरकार कोणतेही पाऊल उचलत नाही. त्यामुळे आम्ही गोवा सरकारला जाब विचारण्यासाठी ९ डिसेंबर रोजी गोवा विधानसभेला घेराव घालत आहोत, असे त्यांनी सांगितले.

कळसा भांडुरा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून न्याय प्रविष्ठ आहे. तरीही कर्नाटक सरकार बेकायदा प्रकल्पाचे काम करत आहे. न्यायालयीन लढाईत कर्नाटकाची पीछेहाट झाली आहे. या प्रश्नावर मध्यस्थी करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकार दिला आहे, असे असतानांनी वाटाळ नागराज घेरावचा इशारा देत आहेत.

Web Title: Belgaum News Vatal Nagraj comment