बेळगावात महिलेवर अत्याचार करून खून

संजय सूर्यवंशी
शनिवार, 27 जानेवारी 2018

श्वानपथक घुटमळले सिव्हीलमध्ये
एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जे .एम. कालीमिर्ची  यांनी श्वान पथकाला बोलावून घेतले. श्वानपथक जिल्हा रुग्णालयाच्या विविध विभागांमध्ये फिरून पुन्हा खून झालेल्या ठिकाणी  येऊन घुटमळले.  त्यामुळे या ठिकाणच्या एखाद्या कर्मचार्‍यानेच या महिलेचा घातपात केला आहे का? या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे

बेळगाव : मध्यमवयीन अनोळखी महिलेचा खून झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. जिल्हा रुग्णालयातील परिसरात नव्याने सुरु होत असलेल्या इंदिरा कॅन्टीनच्या शेडमध्ये हा खून झाल्याचे आढळून आले. खुनापूर्वी सदर महिलेवर अत्याचार केल्याचा ही पोलिसांना संशय आहे. एपीएमसी पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.

जिल्हा रुग्णालय परिसरात नव्याने रा. इंदिरा  कॅन्टीन सुरु होत आहे. त्यासाठी येथे शेड बांधण्यात आलेले आहे. आज सकाळी साडेनऊ वाजता या शेडमध्ये महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सदर महिलेचे  नाक व तोंड दाबून खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. तत्पूर्वी या महिलेवर  अत्याचार झाल्याचा  संशय घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यावरून  पोलिसांना आहे.  परंतु पोलिसांनी याबाबत अद्याप स्पष्टपणे सांगितलेले नाही.

दहा वर्षांपासून सिव्हील परिसरात
सदर महिला 50 ते 55 वर्षांची असून गेल्या दहा वर्षांपासून या परिसरात फिरते. जिल्हा रुग्णालयात उपचार घेणे, त्यानंतर येथील एका मैदानावर स्वच्छता करणे, लोकांकडून मिळेल त्यावर गुजराण करणे असा तिचा दिनक्रम सुरू होता. ती मराठीत बोलायची परंतु कोठून आली व तिची नेमकी कौटुंबिक पार्श्वभूमी काय? याबद्दल कधीही कोणी जाणून घेतले नाही.

श्वानपथक घुटमळले सिव्हीलमध्ये
एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जे .एम. कालीमिर्ची  यांनी श्वान पथकाला बोलावून घेतले. श्वानपथक जिल्हा रुग्णालयाच्या विविध विभागांमध्ये फिरून पुन्हा खून झालेल्या ठिकाणी  येऊन घुटमळले.  त्यामुळे या ठिकाणच्या एखाद्या कर्मचार्‍यानेच या महिलेचा घातपात केला आहे का? या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे

Web Title: Belgaum news women murder in belgaum