बेळगावमध्ये तहसीलदार नायक यांच्या घरावर छापा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

बेळगाव: तहसीलदार भीमा नायक यांच्या येथील घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज (शुक्रवार) छापा टाकला.

माजी मंत्री जनार्धन रेड्डी यांच्याकडील 100 कोटीचा काळा पैसा पांढरा करण्यात त्यांचा हात असल्याचा संशय आहे. यामध्ये किती रक्कम मिळाली याबाबत अद्याप गुप्तता पाळली आहे.

आज सकाळी 8.30 च्या सुमारास एसीबीचे पथक अचानक भीमा नायक यांच्या सदाशिव नगरातील ईश्वर भवन मध्ये दाखल झाले. त्यांनी नायक यांच्या घरातील लोकांकडून काही माहिती जमवली. या ठिकाणी 3 भाडेकरु राहतात, त्यांच्याकडूनही काही माहिती घेतली. सुमारे 4 तास माहिती जमवणे सुरु होते. एसीबीचे डीएसपी एच. के. पठाण यांच्या नेतृत्वाखाली 5 जणांचे पथक कार्यरत होते.

भाजपचे माजी मंत्री जनार्धन रेड्डी यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नात करोडो रुपये खर्च केले होते, यासाठी रक्कम पांढरी करून घेण्यासाठी त्यांना नायक यानी मदत केली, यावेळी नायक यांनी त्यांच्या वाहन चालकाचाही वापर करून घेतला. मानासिक त्रासातून चालकाने आत्महत्या केल्याने हा राज्यभरात चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे भीमा नायक यांच्या राज्यातील 5 ठिकाणच्या मालमत्तेवर एकाच वेळी आज छापे टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: Belgaum: raided in tehsildar bhima nayak's home