बेळगाव परिक्षेत्राच्या आयजीपीना फोनवरून जीवे मारण्याची धमकी

संजय सूर्यवंशी
गुरुवार, 26 एप्रिल 2018

बेळगाव - बेळगाव उत्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक अलोक कुमार यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 21 रोजी घडलेल्या या प्रकरणाची 23 रोजी एपीएमसी पोलिसात नोंद झाली आहे. 

बेळगाव - बेळगाव उत्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक अलोक कुमार यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 21 एप्रिलला घडलेल्या या प्रकरणाची 23 ला एपीएमसी पोलिसात नोंद झाली आहे. 

आयजीपी अलोक कुमार यांना 21 रोजी रात्री साडेनऊ वाजता त्यांच्या सरकारी मोबाईल क्रमांकावर एका अनोळखी व्यक्तीने फोन केला. यावेळी समोरच्या व्यक्तीने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.  

'सलाम वालेकुम.... मी कोण आहे हे तुम्हाला यावर्षी सांगतो, मी नक्षलवादी असून घातक शस्त्रे वापरण्यात मी पारंगत आहे,' असे धमकी देणाऱ्याने वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. हे सर्व तो हिंदीत बोलत होता.

आलोक कुमार हे प्रामाणिक अधिकारी असून त्यांची गुन्हेगारांमध्ये दहशत आहे, याच कारणातून त्यांना धमकी दिली असल्याचा संशय व्यक्त होत आहे. आलोक कुमार यांचे स्वीय सहाय्यक संजीव संगन्नावर यांनी ही माहिती एपीएमसी पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी याबाबतची फिर्याद नोंदवून घेतली आहे. त्यांना आलेल्या फोनचा तपशील घेणे सुरू असल्याचे  पोलिस निरीक्षक रमेश हनापूर यांनी सांगितले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Belgaum range IGP phone threatens to kill