Belgaum : सात लाखांची चांदी;आठ लाख रोकड जप्त कोगनोळी नाक्यावर कारवाई

कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असलेल्या तपासणी नाक्यावर महाराष्ट्र महामंडळाच्या बसची तपासणी केली
 crime police social
crime police social sakal

कोगनोळी : कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असलेल्या तपासणी नाक्यावर महाराष्ट्र महामंडळाच्या बसची तपासणी केली. यामध्ये ६ लाख ६८ हजार ९०० रुपये किमतीचे ९६५० ग्रॅम चांदीचे दागिने असल्याचे निदर्शनास आले. घटना शनिवार १५ रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, हरिराम शंकर माळी (रा. कोल्हापूर) हे महाराष्ट्र महामंडळाच्या बसने कोल्हापूरहून गडहिंग्लजकडे जात होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी तपासणी नाक्यावर आले असता बसची तपासणी केली. यावेळी बसमधील हरिराम माळी यांच्याकडे ६ लाख ६८ हजार ९०० रुपये किमतीचे ९६५० ग्रॅम चांदीचे दागिने असल्याचे निदर्शनास आले. तात्काळ पोलिसांनी चांदीचे दागिने ताब्यात घेऊन पंचनामा केला.

यावेळी जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. संजीव पाटील, सीपीआय एस. सी. पाटील, निपाणी ग्रामीण पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ, उपनिरीक्षक कृष्णा नाईक, उपनिरीक्षक रेवांना गुरीकार, शिवप्रसाद कडकन्नावर, राजू गोरखन्नावर, संदीप गाडीवडर, किरण पुजारी आदी कर्मचारी उपस्थित होते.

आठ लाख रुपये जप्त

कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असलेल्या तपास नाक्यावर कर्नाटक महामंडळाच्या बसची तपासणी केली. यामध्ये आठ लाख रुपये असल्याचे आढळून आले. घटना शनिवारी (ता. १५) दुपारी १२ च्या सुमारास घडली. जिनगोंडा अण्णासाहेब पाटील (रा. पांगीर, ता. चिक्कोडी) हे कर्नाटक महामंडळाच्या बसने कोल्हापूरहून निपाणीकडे जात होते.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी तपासणी नाक्यावर आले असता बसची तपासणी केली. यावेळी बसमधील जिनगोंडा पाटील यांच्याकडे आठ लाख रुपये असल्याचे निदर्शनास आले. तत्काळ रोख रक्कम पोलिसांनी ताब्यात घेऊन पंचनामा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com