esakal | भाजपात आल्यावर नेत्याने काढला ममता दींदीवरील राग, म्हणे TMC त होतो याची लाज वाटते
sakal

बोलून बातमी शोधा

mamata banerjee

तृणमूल काँग्रेसची साथ सोडल्यानंतर शुभेंदु अधिकारी आक्रमक पवित्र्यात गेलेले दिसतायत.

भाजपात आल्यावर नेत्याने काढला ममता दींदीवरील राग, म्हणे TMC त होतो याची लाज वाटते

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोलकाता : तृणमूल काँग्रेसची साथ सोडल्यानंतर शुभेंदु अधिकारी आक्रमक पवित्र्यात गेलेले दिसतायत. भाजपात प्रवेश केलेल्या शुभेंदु अधिकारी यांनी म्हटलंय की त्यांना आता लाज वाटतेय की त्यांनी गेले 21 वर्षे टीएमसीसोबत घालवले. अधिकारी यांनी टीएमसी पक्षामध्ये शिस्त कमी असल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांनी असं देखील म्हटलंय की, पश्चिम बंगालला आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात सोपवायला हवं.

भाजप पक्षाच्या ऑफिसमध्ये पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना अधिकारी यांनी पुढे म्हटलं की, ज्या राजकीय पक्षाशी मी आधी जोडलेला होतो त्या पक्षात आता शिस्त उरली नाहीये. तो पक्ष एक कंपनी बनला आहे. मला लाज वाटते की मी त्या पक्षासोबत गेली 21 वर्षे होतो. त्यांनी दोन पक्षांशी तुलना करत म्हटलं की, तृणमूल काँग्रेसच्या बैठकांमध्ये पारित होणाऱ्या प्रस्तावांचे रेकॉर्ड देखील ठेवले जात नाहीत. आता आपण एकत्र येऊन काम करु जेणेकरुन राज्यात 2021 साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाची सत्ता येईल. तसेच पश्चिम बंगाल 'सोनार बांग्ला' बनेल. पश्चिम बंगालला नरेंद्र मोदींसारख्या सक्षम नेतृत्वाच्या हातात सोपवायला हवं. 

हेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज 72 वी 'मन की बात'; कृषी कायद्यांवर बोलण्याची शक्यता

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा उल्लेख करत त्यांनी म्हटलं की, अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांना लाभ देणाऱ्या या योजनेचा फायदा झाला आहे. मात्र, पश्चिम बंगाल सरकारने यास नकार दिला ज्यामुळे बंगालमधील शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेले आहेत. त्यांनी म्हटलं की, आता गरज आहे की देशात सत्तेवर असणारा पक्षच राज्यात देखील सत्तेवर यावा. 

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठे झटके बसले आहेत. त्यांच्या पक्षातील अनेक आमदारांनी तसेच प्रमुख नेत्यांनी पक्षाची साथ सोडली आहे. 'तृणमूल’चे आमदार शीलभद्र दत्त आणि अल्पसंख्याक गटाचे नेता कबीर उल इस्लाम यांनी शुक्रवारी पक्षाचा राजीनामा दिला. या आधी सुवेंदू अधिकारी आणि जितेंद्र तिवारी हेही ‘टीएमसी’तून बाहेर पडले आहेत.