बंगाल बॅनर्जींना चोख प्रत्युत्तर देईल: भाजप

वृत्तसंस्था
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - नोटांबदीच्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका करणाऱ्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना बंगाल चोख प्रत्युत्तर देईल, अशा प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाने व्यक्त केल्या आहेत.

नोटाबंदीच्या निर्णयामुळे मोदी सरकारला पुढील लोकसभा निवडणुकीत देश शिक्षा करेल, असे वक्तव्य बॅनर्जी यांनी केले होते. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भारतीय जनता पक्षाच्या खासदार रूपा गांगुली म्हणाल्या, "नोटाबंदीनंतर महाराष्ट्रातील निवडणुकांचे निकाल विरोधकांसाठी सणसणीत चपराक आहे. पश्‍चिम बंगालमधील कूच बिहार येथे आम्ही दुसरे स्थान मिळविले आहे. आम्हाला बंगालमध्येही चांगली मते मिळाली आहेत. त्यांना (बॅनर्जी) त्यांचे उत्तर लवकरच मिळेल. त्या स्वत:चे महत्व वाढविण्यासाठी भारतभर फिरत आहेत. एक स्त्री असूनही त्या पश्‍चिम बंगालमधील बालकांची तस्करी रोखू शकलेल्या नाहीत', अशी टीकाही गांगुली यांनी यावेळी केली.

बॅनर्जी यांनी आज (बुधवार) एका सभेत बोलताना "आपले पंतप्रधान हे बिग बाजारचे बिग बॉस आहेत' असे म्हणत मोदींवर निशाणा साधला आहे. नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांमध्ये ममता बॅनर्जी अग्रस्थानी आहेत.

Web Title: Bengal will give befitting reply to Mamata: BJP